गोपाळकृष्ण शाळेत हिंदी दिवस साजरा

.

गोपाळकृष्ण शाळेत हिंदी दिवस साजरा

१४ सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय हिंदी दिवस म्हणून सगळीकडे साजरा केला जातो .गोपाळकृष्ण शाळेत हिंदी दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षिका कविता परब हिने केले. ‘मन की वीना से गुंजीत ध्वनी मंगलम’ या मधुर स्वागतपर गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. इयत्ता सातवीच्या विद्यार्थिंनी”हिंदी भाषा राष्ट्र की भाषा” या गीतावर नृत्य सादर केले. हिंदी दिवसाच्या निमित्ताने कविता सादरीकरण स्पर्धा घेण्यात आली .ही स्पर्धा दोन विभागांमध्ये घेण्यात आली. इयत्ता पाचवी यांचा एक गट व सहावी व सातवी यांचा दुसरा गट असे दोन गट करण्यात आले होते. पहिल्या गटात प्रथम पारितोषिक प्राप्त झाले कु.तनवी सावंत ,दुसरे पारितोषिक साजिया खान व तिसरे पारितोषिक मोहिनी राठोड हिला प्राप्त झाले.दुसऱ्या गटामध्ये पहिले पारितोषिक शिवांगी राठोड, दुसरे पारितोषिक अनिखा खान व तिसरे पारितोषिक नमिष कारेकर याला प्राप्त झाले. कविता सादरीकरण स्पर्धेचे परिक्षण शिक्षिका उर्वी गोसावी यांनी केले.हिंदी दिवसाच्या निमित्ताने हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आली होती. तर या स्पर्धेमध्ये प्रथम बक्षिस प्रांजोल यादव ,दुसरे बक्षीस साजिया खान व तिसरे बक्षीस अनंत नाईक याला मिळाले. तसेच भिंती पत्रक स्पर्धेमध्ये इयत्ता पाचवी वर्ग विजेता ठरला
हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे. तसेच जगातील सर्वात बोलली जाणारी अशी भाषा आहे. हिंदी दिवसाचे महत्व शिक्षिका राही सालोस्कर व सहावी वर्गातील विद्यार्थी सुरेश ताटे यांने सांगितले. शिक्षिका राही सालोस्कर यांनी हिंदी भाषेच्या थोर परंपरेवर प्रकाशझोत टाकला , तसेच सुरेश ताटे याने आपल्या भाषणातून सांगितले की आज जरी सगळीकडे इंग्रजी भाषेचा प्रभाव असला तरी हिंदी भाषेच द्विगुणित असणारे महत्त्व अबाधित आहे आणि या हिंदी भाषेच्या उन्नतीसाठी या भाषेचा वापर किती महत्वाचा हे त्याने आपल्या भाषणातून सांगितले.
या कार्यक्रमाचे शोभा वाढविण्यासाठी इयत्ता सातवी वर्गातील विद्यार्थ्यांनी ‘उपकार की परतफेड’ हे नाटक सादर केले. कार्यक्रमाच्या शेवटी विजेत्यांना उपस्थित सर्व शिक्षकांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली. बक्षीस वितरण सोहळ्याचे सूत्र शिक्षिका साक्षी देसाई यांनी सांभाळले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता सातवी वर्गातील विद्यार्थिनी श्रेया भोसले हिने केले तर आभार प्रदर्शन इयत्ता सातवी वर्गातील विद्यार्थी बसवराज अंगडी यांनी केले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar