नादोडा_ रेवाडा येथील सरकारी हायस्कूल मध्ये अभियंता दिन साजरा करण्यात आला. 

.
नादोडा_ रेवाडा येथील सरकारी हायस्कूल मध्ये अभियंता दिन साजरा करण्यात आला.
या दिनाचे औचित्य साधून जायट् ग्रुप ऑफ थिवी तफै प्रश्न मंजुषा स्पर्धा घेण्यात आली होती. पृथ्वी वाचवा या विषयावरील या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक गुंजन तळर्णकर हिला मिळाला तर नुपूर गावस व साईल कलंगुटकर याना अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त झाला. देविका चोपडेकर व सुनीता प्रसाद यांना उतेजनार्थ बक्षिस मिळाले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते विजेत्याना बक्षिसे देण्यात आली. यावेळी व्यासपीठावर जायट् ग्रुप ऑफ थिवी चे अध्यक्ष निलेश होनाडकर, जायट् फेडरेशन दहा चेअध्यक्ष बसवराज पुजारी, होनवाड, हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय दिवकर, जेष्ठ शिक्षक सुभाष नाईक उपस्थित होते.
माजी अध्यक्ष होनवाड यांनी जायट् ग्रुप करीत असलेल्या कार्याबद्दल त्यांची माहिती दिली बसवराज पुजारी यांनी पृथ्वी वाचवण्यासाठी सौर ऊर्जा चा वापर करण्याचे आवाहन केले. मुख्याध्यापक संजय दिवकर यांनी स्वागत केले. जायट् ग्रुप ऑफ थिवी चे अध्यक्ष निलेश होडारकर यांनी आभार मानले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar