आगरवाडा ते मांद्रे या दरम्यान प्रमुख जिल्हा मार्ग १७ वरील रस्त्याच्या बाजूला विजेच्या भूमिगत केबल्स टाकताना वीज खात्याचा कंत्राटदार आणि सार्वजनिक बांधकाम खात्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना हाती न घेतल्याने वाहनचालकांना धोका निर्माण झाला आहे

.

आगरवाडा ते मांद्रे या दरम्यान प्रमुख जिल्हा मार्ग १७ वरील रस्त्याच्या बाजूला विजेच्या भूमिगत केबल्स टाकताना वीज खात्याचा कंत्राटदार आणि सार्वजनिक बांधकाम खात्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना हाती न घेतल्याने वाहनचालकांना धोका निर्माण झाला आहे . याप्रकरणी ‘स्वराज’ संस्थेने कंत्राटदार मेसर्स अरविंदा इलेक्ट्रिकल्स, बेंगळूर आणि त्यांचे सहभागीदार मेसर्स पायोनिरो इफ्रा प्रायव्हेट लिमिटेड, पर्वरी यांच्याविरोधात एफआयआर नोंद करण्याची मागणी पेडणे पोलिसांकडे केली आहे. यासंदर्भात निरीक्षक दत्ताराम राऊत यांनी शनिवारी सकाळी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना पाचारण केले आहे.
‘स्वराज’ संस्थेचे अध्यक्ष अॅड. किशोर शेट मांद्रेकर, निमंत्रक अॅड. प्रसाद शहापुरकर, कार्यकारिणी सदस्य जगन्नाथ पार्सेकर आदी सदस्य आणि पार्सेचे माजी सरपंच गुरुदास पांडे, रोहिदास आरोलकर आदी नागरिकांनी निरीक्षक दत्ताराम राऊत, उपनिरीक्षक सुमेधा नाईक यांची भेट घेऊन वीज खात्याच्या कंत्राटदाराने सर्व नियम धाब्यावर बसवून काम हाती घेतल्याने प्रवासी आणि वाहनचालकांच्या जिवाला धोका निर्माण झाल्याचे निदर्शनास आणून दिले. याप्रकरणी चौकशी करून योग्य ती कारवाई करू असे आश्वासन पोलिस अधिकाऱ्यांनी दिले. ‘स्वराज’ संस्थेने सार्वजनिक बांधकाम खात्याचा रस्ता विभाग, वीज खाते आणि मांद्रे ग्रामपंचायत यांना वीज केबल्ससाठी भूमिगत वाहिनी खोदताना निर्माण झालेल्या धोकादायक स्थितीकडे तक्रारीद्वारे तीन दिवसांपूर्वी लक्ष वेधले होते. सध्या आगरवाडा येथे चढणीवर प्रमुख जिल्हा मार्ग १७ वर काम सुरू आहे. केबल्स टाकण्यासाठी रस्त्याकडेला मोठे चर खोदले आहे. त्यामधील मातीच्या थरांनी अर्ध्याहून अधिक रस्ता व्यापला आहे. पावसामुळे सर्व रस्ता निसरडा झाला असून रोज दुचाकीस्वार घसरून पडत आहेत. काहीजण जखमी झाले आहेत. वाहतुकीला मातीच्या थराचा अडथळा होत आहे. हा रस्ता नेहमीच वर्दळीचा असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. संबंधित कंत्राटदाराने कामाच्या ठिकाणी कोणत्याही सुरक्षिततेच्या उपाययोजना हाती घेतलेल्या नाहीत. वाहतूक एकेरी होत आहे. मांद्रे मतदारसंघातील तुये, तसेच अंतर्गत रस्त्यावरही असेच काम सुरू आहे. शुक्रवारी आज) जुनसवाडा येथे अशा कामाच्या ठिकाणी कदंब बस कलंडली. सुदैवाने प्रवासी बचावले.
रात्रीच्यावेळी तर वाहनचालकांची या भागात त्रेधा उडत आहे. हा सर्व प्रकार धोकादायक असून वीज खात्याचा कंत्राटदार आणि सार्वजनिक बांधकाम खाते वाहनचालकांच्या जिवाशी खेळत आहे. बांधकाम खात्याचे रस्ता विभागाचे पेडणेतील सहाय्यक अभियंत एल. व्ही. नाईक यांचीही ‘स्वराज’च्या शिष्टमंडळाने भेट घेऊन वरील प्रकार लक्षात आणून दिला आणि त्वरित कार्यवाही करण्याची मागणी केली. ‘स्वराज’ वीज केबल टाकण्याच्या विरोधात अजिबात नाही, मात्र कामाच्या ठिकाणी आवश्यक उपाय योजायला हवेत, असे शिष्टमंडळाने सांगितले. त्यानंतर नाईक यांनी कार्यकारी अभियंता बेळगावकर यांच्याशी मोबाईलवरून संपर्क केला असता वीज कंत्राटदाराला काम करण्यासाठीचे पत्र मार्चमध्ये मिळाले पण त्यांनी हल्लीच सार्वजनिक बांधकाम खात्याकडे रस्ता खुदाईसाठी परवानगी मागितली. त्यासाठीचा एस्टिमेट नुकताच करण्यात आला. परंतु कंत्राटदाराला अजून परवानगी दिलेली नसताना काम सुरू केले, असे बेळगावकर आणि नाईक या अभियंत्यांनी सांगितले. यामुळे सदर काम बेकायदा सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.
बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिल्यानंतर वीज कंत्राटदार लोकांच्या जिवाशी खेळत असल्याबद्दल ‘स्वराज’ संस्थेने सीआरपीसी कलम १५४ (१) खाली आणि भादंसंच्या कलम ३३६ अन्वये पोलिसांत एफआयआर नोंद करण्यासाठी लेखी निवेदन दिले आहे.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar