नवरात्रोत्सवात ‘सेक्स-तंत्र शिबीर’ हिंदू धर्माच्या विकृतीकरणासाठी ?*

.

 

 

*नवरात्रोत्सवात ‘सेक्स-तंत्र शिबीर’ हिंदू धर्माच्या विकृतीकरणासाठी ?*

*आयोजकांवर गुन्हे दाखल करून कार्यक्रमावर बंदी घाला !* – हिंदु जनजागृती समिती

पुणे शहरात लैंगिक प्रशिक्षणाच्या नावाखाली नवरात्रोत्सवात तीन दिवसाचं ‘सेक्स-तंत्र’ शिबिर आयोजित करण्यात आल्याची जाहिरात सोशल मीडियावर प्रसारित झाली आहे. हिंदूंच्या पवित्र नवरात्रोत्सवाला कलंकित करण्याचा हा घृणास्पद प्रकार आहे. ज्या नवरात्रीमध्ये स्त्रीचे देवीस्वरूपात पूजन केले जाते, त्याच कालावधीत स्त्रीला विकृत स्वरूपात दाखवणे ही मानसिक विकृतीच आहे. या प्रकारातून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्यात आल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने आणि राज्य महिला आयोगाने या विकृतीची गंभीर दखल घेऊन आयोजकांवर कठोर कलमांतर्गत गुन्हे दाखल करावेत, तसेच सदर कार्यक्रमावर बंदी घालावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे.

1 ते 3 ऑक्टोबर असे तीन दिवस पुण्यातील कॅम्प भागात ‘नवरात्री स्पेशल’ नावाने सेक्स-तंत्र शिबिर घेण्यात येणार आहे. या शिबिरामध्ये सहभागी होण्यासाठी प्रत्येकी 15 हजार रुपये घेण्यात येणार आहे. हिंदूंच्या उत्सवाच्या निमित्ताने असे अश्लील स्वरूप दाखवून धार्मिक विद्वेष निर्माण करण्याचा हा प्रकार आहे. तसेच सदर जाहिरातीवरून हे सेक्स रॅकेट तर नाही ना, याचीही पोलिसांनी सखोल तपासणी केली पाहिजे. अशा विकृतींना तात्काळ पायबंद घातला पाहिजे. या संदर्भात हिंदु जनजागृती समिती समविचारी संघटनांसह पोलीस आयुक्तांकडे तक्रार करणार असून या कार्यक्रमाला तीव्र विरोध करणार आहे.

आपला नम्र,
*श्री. सुनील घनवट,*
राज्य संघटक, महाराष्ट्र आणि छत्तीसगड,
हिंदु जनजागृती समिती. (संपर्क क्र.: 70203 83264)

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar