हिंदु जनजागृती समितीतर्फे कांदोळी येथे श्री सिद्धीिनायक मंदिरात स्वसरक्षण प्रात्यक्षिके सादर
*राष्ट्रावरील आघात रोखण्यासाठी हिंदूंमधील शौर्य जागृत करणे आवश्यक – श्री. श्रीयश पिसोळकर*
म्हापसा, दि. 15 सप्टेबर (वार्ता.) – जोपर्यंत हिंदुकडे शस्त्र आहेत तोपर्यंत हिंदुस्थानावर राज्य करणे अश्यक्य होते यास्थव ब्रिटिशांनी ‘आर्मस अॅक्ट’ अस्तिवात आणला. तसेच अहिंसा परमोधर्मा हा मंत्र अर्धाच शिकवून हिंदूंचे शौर्य लयास नेले. यामुळे आपल्या राष्ट्रावर अनेकविध आघात होत आहेत. असे आघात रोखण्यासाठी हिंदुमधील शौर्य जागृत करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन श्री. श्रेयस पिसोळकर यांनी केले.
श्री सिद्धिवनायक देवस्थान, कांदोळी, बार्देश-गोवा येथे एकवीस दिवसांच्या गणेश उत्सवात हिंदु जनजागृती समितीच्या स्वसरक्षण प्रशिक्षण प्रात्यक्षिकांचे आयोजन देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रात्यक्षिके सादर करण्यापूर्वी स्वसरक्षणाचे महत्व व आवशकता याविषयावर ते बोलत होते.
आपण अहिंसेने वागले पाहिजे हे जरी खरे असले तरी जेव्हा स्वसरक्षण व राष्ट्ररक्षण यागोष्टींचा प्रश्न निर्माण होतो तेंव्हा ते चुकीचे ठरेल. आपल्या देवतांच्या हातात शस्त्र आहेत, हे आपण लक्षात घ्यायला हवे. सीमारेषेवर जवानाच्या हातात शस्त्र आहेत तोपर्यंत आपण सुरक्षित आहोत. दुष्ट मतलेल्या अफझलखानाचा छ. शिवाजमहाराजांना वध करावाच लागतो. याला कोणी हिंसा म्हणू शकत नाहीत. आपल्यातले शौर्य प्रयत्नपूर्वक नष्ट केले आहे. त्यामुळे स्वातंत्र्याच्या अमृमहोत्सवी वर्षातहि हिंदूंना आधात सोसावे लागत आहेत. छ. शिवाजमहाराजांनी अवघ्या सोळाव्या वर्षी अश्या आघातांना सामोरे जाण्यासाठी मावळ्यांचे संघटन करून किल्ला जिंकला. पण आजची तरुण पिढी व्यसनाधीन झाली आहे. या तरुणांना जागृत कण्यासाठी आणि त्यांच्यात धर्म व राष्ट्र रक्षणाचे बीज पेरण्यासाठी धर्मशिक्षण व स्वसरक्षण प्रशिक्षण आवश्यक आहे, असे ते शेवटी म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, उद्देश व आभार श्री. युवराज गावकर यांनी केले. कार्यक्रमाला महिला, मुले व पुरुष अश्या सत्तर जनांनी उपस्थिती लावली.