आगरवाडा- मांद्रे दरम्यान विजेसाठीचे भूमिगत केबल्स टाकताना यापुढे सर्व ती काळजी घेतली जाईल

.

आगरवाडा- मांद्रे दरम्यान विजेसाठीचे भूमिगत केबल्स टाकताना यापुढे सर्व ती काळजी घेतली जाईल आणि लोकांच्या सुरक्षिततेच्यादृष्टिने आवश्यक उपाययोजना केल्या जातील, अशी ग्वाही कंत्राटदार मेसर्स अरविंदा इलेक्ट्रिकल्स – बेंगळूर आणि त्यांचे सहभागीदार मेस्त पायोनिरो इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड – पर्वरी यांनी आज (शनिवारी) पेडणेचे पोलिस निरीक्षक दत्ताराम राऊत यांनी बोलवलेल्या बैठकीत दिली.
सदर बैठकीत ‘स्वराज’ संस्थेचे निमंत्रक अॅड. प्रसाद शहापुरकर, पदाधिकारी जगन्नाथ पार्सेकर, सहदेव मांद्रेकर, मेघश्याम मांद्रेकर, कंत्राटदार तसेच वीज खात्याचे अधिकारी उपस्थित होते. मात्र रस्ता विभागाचे सहाय्यक अभियंता लक्ष्मण नाईक गैरहजर राहिल्याने निरीक्षक राऊत यांनी नाराजी व्यक्त केली.
कंत्राटदार व वीज खात्याचा अधिकार्‍यांनी सर्व जबाबदारी स्वीकारून, वाहतूक सुरळीत चालू ठेवण्यासाठी सर्व उपाय करण्याचे आश्वासन बैठकीत दिले. स्वराज संस्थेच्या सर्व अटी आणि सूचना मान्य केल्यानंतरच बैठक समाप्त झाली. ‘स्वराज’ संस्था या कामावर निगराणी ठेवणार असून कंत्राटदाराचा हलगर्जीपणा चालू राहिला तर पुढील आवश्यक कृती करणार असल्याचे अॅड. शहापुरकर यांनी सांगितले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar