पोषण महासप्ताह अंतर्गत स प्रा वि मधलावाडा केरी शाळेत पालकांसाठी अनेक उपक्रम
“आरोग्यं धन संपदा” याचे महत्त्व आपल्या जीवनात जाणून शाळेने पालकांसाठी पोषण आहार याविषयी जागृती करण्यासाठी पालकांसाठी व मुलांसाठी अनेक उपक्रम राबविले.
त्यात पालकांसाठी कढ धान्य पासून रांगोळी स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत प्रथम क्रमांक अनिश्का हर्जी, दुसरा क्रमांक सीमा नाईक, तिसरा क्रमांक कृत्तिका गाड तर उत्तेजनार्थ संगीता नाईक व सोनाली तळकर यांना मिळाला .
तर पालेभाज्या फळभाज्या पासून पौष्टिक थाळी या स्पर्धेत प्रथम क्रमांक सीमा नाईक, ,दुसरा क्रमांक अर्चना नाईक,,तिसरा क्रमांक दिपाली नार्वेकर यांना मिळाले दोन्ही स्पर्धेचे परीक्षण तूये आरोग्य केंद्राचे कर्मचारी श्री मोराजकार व केरी आरोग्य केंद्राचे सिस्टर सौ दीपा गडेकर यांनी केले.
शाळेतील विद्यार्थ्यासाठी न शिजवता पाककला स्पर्धा घेण्यात आली यात लहान गटात
जागृती केरकर प्रथम,राशी नाईक दुसरी तर भुवी नाईक हिने तिसरा क्रमांक पटकावला. मोठ्या गटात
श्रेयसी तळकर प्रथम,शांभवी कुबल दुसरे, मानस वेंगुर्लेकर तिसरे,तर उत्तेजनार्थ पारितोषिक अरोही देवजी व यश गाड यांना मिळाले.तसेच विद्यार्थ्यासाठी चित्रकला स्पर्धा, व किचन गार्डन हा उपक्रम घेण्यात आला.
यावेळी शाळेतील मुलांना तसेच उपस्थित पालकांना पौष्टिक आहार यावर श्री मोराजकर यांनी मार्गदर्शन केले तसेच सौ दीपा गडेकर यांनी मुलांना वैयक्तिक स्वच्छते वर व आहारावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षिका सोनाली हरमलकर यांनी केले तर शाळा प्रमुख सौ यशश्री नाईक यांनी आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षिका विद्या मोराजकर,अंगणवाडी शिक्षिका मीना बुडके,पूर्व प्राथमिक विभागाच्या शिक्षिका मिलन कोरखनकर यांनी सहकार्य केले.यावेळी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.सर्वांनी शाळेतील या उपक्रमाचे कौतुक केले.
पोषण महासप्ताह अंतर्गत स प्रा वि मधलावाडा केरी शाळेत पालकांसाठी अनेक उपक्रम
.
[ays_slider id=1]