सेपेकटेकरो स्पर्धेत हरमल पंचक्रोशी उच्च माध्यमिक विद्यालयाचे यश

.

सेपेकटेकरो स्पर्धेत हरमल पंचक्रोशी उच्च माध्यमिक विद्यालयाचे यश.
क्रीडा आणि युवा व्यवहार संचालनालयातर्फे आयोजित सेपेकटेकरो स्पर्धेत हरमल येथील हरमल पंचक्रोशी उच्च माध्यमिक विद्यालयाने विभाग एक मध्ये 19 वर्षाखालील मुलींच्या गटात विजेतेपद पटकावून आंतर विभागीय पातळीवरील स्पर्धेत प्रवेश केला आहे.
पेडे – म्हापसा येथील क्रीडा संकुलात संपन्न झालेल्या या स्पर्धेत हरमल पंचक्रोशी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थिनी लारिया फर्नांडिस, रिचा मटकर, अमिषा तेली व साईजल गडेकर यांनी कर्णधार साधना अश्वेकर हिच्या नेतृत्वाखाली आपल्या उत्कृष्ट क्रीडा कौशल्याची चुणूक दाखविताना सेंट टेरेसा उच्च माध्यमिक विद्यालय कांदोळी, पुरुषोत्तम वालावलकर उच्च माध्यमिक विद्यालय खोर्ली म्हापसा आणि अंतिम स्पर्धेत पी.व्ही.एस. मधुसूदन कुशे उच्च माध्यमिक विद्यालय आसगाव यांच्यावर प्रत्येकी 2-0 सेट ने मात करत विभाग एक मधील विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले व आंतरविभागीय पातळीवर प्रवेश केला
विद्यार्थ्यांच्या या नेत्रदीपक यशासाठी हरमल पंचक्रोशी शिक्षण मंडळाचे चेअरमन व माजी मुख्यमंत्री श्री. लक्ष्मीकांत पार्सेकर, व्यवस्थापिका स्मिता पार्सेकर, प्राचार्य गोविंदराज देसाई, पालक शिक्षक संघ तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar