संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान ( गोवा) आयोजित नैतिक शिक्षण योजने अंतर्गत शिक्षक व मुख्याध्यापक यांच्या साठी एक दिवसीय कार्यशाळा म्हापसा येथे पार पडली.  

.
   थिवी वाताहार संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान ( गोवा) आयोजित नैतिक शिक्षण योजने अंतर्गत शिक्षक व मुख्याध्यापक यांच्या साठी एक दिवसीय कार्यशाळा म्हापसा येथे पार पडली. 
यावेळी संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान चे विश्वस्त तथा सचिव मोहन सालेकर ( मुंबई), कोकण प्रांत उपाध्यक्ष संतोष नाईक, प्रमोद सांगोडकर, संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान चे गोवा प्रमुख भारत बेतकेकर, प्रशांत परब, मुख्याध्यापक नागेश गोसावी, कुसुम पेडणेकर उपस्थित होते.
यावेळी मोहन सालेकर यांनी संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान ही अशासकीय सामाजिक संस्था असून गेली १९ बर्षे नैतिक शिक्षणाचा प्रचार-प्रचाराचे कार्य करीत असल्याचे सांगितले. शालेय विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीची, संस्कारांची आणि महापुरुषांची ओळख व्हावी या हेतूने नैतिक शिक्षण योजना हा उपक्रम राबवित असल्यचे  पुढे बोलताना सांगितले.
कोकण प्रांत उपाध्यक्ष संतोष नाईक यांनी केवळ परीक्षा घेणे हा या उपक्रमाचा हेतू नसल्याचे सांगताना याचा मुळ उद्देश कथांचा माध्यमातून संस्काराचे बीजारोपण करणे आवश्यक आहे.
कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन व भारत मातेच्या प्रतिमेला पुष्पहार करून करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संध्या परब यांनी केले. भारत बेतकेकर यांनी प्रास्ताविक केले तर नागेश गोसावी यांनी परीचय करून दिला. शिक्षकाच्या वतीने योगेद्र बांदेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले
कांती कुबल यांनी आभार मानले. बादैश, पेडणे व डिचोली तालुक्यातील २० शिक्षकांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला.
संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान कार्यशाळेत मार्गदर्शन करताना मोहन सालेकर, बाजूला बसलेले संतोष नाईक,  कुसुम पेडणेकर  भारत बेतकेकर , नागेश गोसावी व इतर

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar