TECNO भारतात घेऊन येत आहे पहिला मल्टी कलर चेंजिंग स्मार्टफोन – CAMON 19 Pro Mondrian

.

TECNO भारतात घेऊन येत आहे पहिला मल्टी कलर चेंजिंग स्मार्टफोन – CAMON 19 Pro Mondrian

CAMON 19 Pro Mondrian ची किंमत ₹१७,९९९ आहे.
CAMON 19 Pro Mondrian चे प्री-बुकिंग २२ सप्टेंबर २०२२ पासून Amazon वर सुरू होईल आणि SBI कार्ड्सवर १०% सूट मिळेल.

नवी दिल्ली, १५ सप्टेंबर २०२२: TRANSSION India चा प्रीमियम स्मार्टफोन ब्रँड TECNO Mobile ने भारतात, आपला नवीन मल्टी कलर चेंजिंग स्मार्टफोन CAMON 19 Pro Mondrian लॉन्च करण्याची घोषणा केली. आपल्या ‘इंडिया फर्स्ट’ आणि ‘सेगमेंट फर्स्ट’ दृष्टिकोनावर खरे उतरून, CAMON 19 Pro Mondrian भारतातील पहिला मल्टी कलर चेंजिंग स्मार्टफोन आहे. पॉलीक्रोमॅटिक फोटोइसॉमर तंत्रज्ञानामुळे ह्या स्मार्टफोनच्या मोनोक्रोम बॅक कव्हरला प्रदीपनाखाली अनेक बदलणारे रंग दाखवता येतात, ज्यामुळे एक तल्लीन करणारा “लाइट चेसिंग” अनुभव मिळतो. अभिनव प्रणाली अल्ट्राव्हायोलेट प्रकाशाखाली प्रकाशसंश्लेषण आण्विक बंधांच्या साखळीच्या पुनर्प्राप्ती आणि खंडित प्रभावाचा वापर करते, ज्यामुळे रंगहीन आण्विक गट क्रोमोजेनिक बनतात आणि रंगहीन बनतात. फोनचे डिझाईन मॉन्ड्रियन आर्टपासून प्रेरित आहे, या उत्पादनाला यापूर्वीच यूएसए म्यूज डिझाईन अवॉर्ड आणि इटलीचा ए’ डिझाइन अवॉर्ड मिळाला आहे.

कॅमेरा केंद्रित CAMON सिरीजमध्ये ‘इंडस्ट्री फर्स्ट’ तंत्रज्ञान असणारी प्रत्येक गोष्ट आहे. TECNO च्या नवीन CAMON मध्ये RGBW + (G+P) सेन्सरसह या सेगमेंट मधील पहिला 64MP प्राथमिक कॅमेरा आहे, ज्यामुळे उजळ छायाचित्रांसाठी २००% अधिक प्रकाश सेन्सरमध्ये येऊ शकतो. ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) आणि हायब्रीड इमेज स्टॅबिलायझेशन (HIS) सोबतच, स्मार्टफोन अगदी अनुकूल नसलेल्या प्रकाश परिस्थितीतही उत्तम फोटो आणि व्हिडिओं टिपू शकतो. ५० एमपी कॅमेरा आणि ५०एमएम गोल्डन फोकस पोर्ट्रेटसह, ज्याला मानवी डोळ्यांच्या सर्वात जवळचे फोकस म्हटले जाऊ शकते असा फोकस देतो. स्मार्टफोन ३००% पर्यंत वाढीव फोकस गतीसह सुसज्ज आहे ज्यामुळे लेझर डिटेक्शन फोकस वापरून अधिक अचूक फोटो कॅप्चर करता येतात.

कॅमेरा-केंद्रित CAMON सिरीज अंतर्गत अलीकडेच लॉन्च करण्यात आलेल्या ह्या फोन संबंधी भाष्य करताना, TECNO इंडियाचे CEO, अरिजीत तलपात्रा म्हणाले, “TECNO हे sub10K विभागातील भारतातील टॉप ४ स्मार्टफोन्स ब्रँडमध्ये गेल्या ६ महिन्यांपासून- जानेवारी-जुलै २०२२ पर्यंत सातत्याने आहे. आमच्या १५ लाख आनंदी वापरकर्त्यांच्या आधारे आम्ही ही कामगिरी केली. आमच्या CAMON मालिकेवर स्वार होऊन, आम्ही वाढीच्या पुढच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहोत, ज्यामध्ये मध्य ते उच्च विभागाला मोठी चालना मिळेल. स्मार्टफोन्सची ही श्रेणी सतत विकसित होत असलेल्या ग्राहकांच्या गरजा पूर्ण करते ज्या उच्च-श्रेणी कॅमेरा तंत्रज्ञान आणि स्टाईलचा उत्तम समतोल पुरवतात याची मी हमी देते. CAMON 19 Mondrian च्या ह्या लाँचसह, आम्ही तंत्रज्ञान आणि फॅशन उच्च दर्जाचे एकत्रिकरण ग्राहकांना स्मार्टफोनमध्ये उपलब्ध करून देतोय तेही वाजवी किमतीत.”

TECNO CAMON 19 सिरीज या वर्षी जुलैमध्ये लॉन्च करण्यात आली होती आणि ह्या अंतर्गत सध्या चार उत्पादने आहेत-CAMON 19 Neo, CAMON 19, CAMON 19 Pro 5G आणि CAMON 19 Pro Mondrian.

CAMON 19 Pro Mondrian ची किंमत ₹१७, ९९९ असेल आणि प्री-बुकिंग २२ सप्टेंबर २०२२ पासून Amazon वर सुरू होईल.

TECNO CAMON 19 Pro Mondrian ची खास वैशिष्ट्य

मॉन्ड्रियन आर्टस् पासून प्रेरित भारतातील पहिला मल्टी कलर चेंजिंग फोन
CAMON 19 Pro Mondrian प्रत्येकालाच मिरवावसा वाटेल इतका सुंदर आहे. स्मार्टफोनमध्ये जगातील पहिले सूर्यप्रकाश रेखाटणारे बॅक पॅनेल आहे, जे सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यावर प्रकाशाचे अनेक रंगांमध्ये रूपांतर करते आणि फोनला अधिक आकर्षक बनवते.

अल्ट्रा क्लॅरिटीसाठी RGBW+(G+P) लेन्ससह इंडस्ट्रीतील पहिलाच 64MP OIS कॅमेरा
CAMON 19 Pro Mondrian मध्ये, RGBW+(G+P) सेन्सरसह 64MP+50MP+2MP ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यामुळे कमी प्रकाशात फोटोग्राफीचे बरेच पर्याय आणि आकाश बदलणे, सायबरपंक, ड्रीमी यासारखे आकर्षक फिल्टर आहेत. सुपर हायब्रिड इमेज स्टॅबिलायझेशन, व्हिडिओ HDR, व्हिडिओ बोकेह आणि फिल्म मोडसह तुमचे व्हिडिओ शूट कौशल्यपूर्ण होईल. छायाचित्रे अधिक स्पष्टपणे पाहण्यासाठी 30x झूम आणि 4-इन-1 पिक्सेल बिनिंग तंत्रज्ञान असणारा ३२ एमपी सेल्फी कॅमेरा देखील आहे.

०.९८ मिमी बेझल्स आणि ६.८” FHD+ डिस्प्ले व 120Hz रिफ्रेश रेट
अल्ट्रा-स्मूथ अनुभवासाठी ह्या फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट आहे. तसेच ०.९८ मिमी चे नॅनो बेझल व स्क्रीन-टू-बॉडी रेशीओ ९४.२६% आहे जो ६.८” FHD+ डिस्प्लेवर व्हिज्युअल मेजवानीची हमी देतो. ह्याचे वाईडव्हाइनL1 सर्टिफिकेशन तुम्हाला 1080P पर्यंत रेझोल्यूशनसह आवडते OTT पाहण्याची मजा देते. CAMON 19 Pro Mondrian ला TUV Rheinland Eye Protection ने प्रमाणित केले आहे, जे हानिकारक ब्लू लाइट फिल्टर करते आणि स्ट्रेन-लेस व्हिज्युअल अनुभव देते.

मेमरी फ्यूजनसह १३ जीबी रॅम आणि गती वाढवण्यासाठी १२८ जीबी UFS २.२ अंतर्गत स्टोरेज
CAMON 19 Pro Mondrian मध्ये तुम्हाला मिळते मेमरी फ्यूजनसह १३ जीबी रॅम. ह्यात ८ जीबी LPDDR4x रॅम बरोबरच ५ जीबी पर्यंत व्हर्च्युअल रॅम आहे. त्याचसोबत १२८ जीबी UFS २.२ अंतर्गत स्टोरेज जे ५१२ जीबी पर्यंत वाढवता येण्याजोगे आहे.

द्दीर्घ बॅकअपसाठी 5000mAh उच्च क्षमतेच्या बॅटरीसह 33W फ्लॅश चार्जर
33W फ्लॅश चार्जरसह केवळ १३ मिनिटांत ३०% इतक्या वेगाने बॅटरी चार्ज होते. फोनची 5000mAh बॅटरी, ३७ दिवसांचा स्टँडबाय टाईम आणि १२४ तासांचा म्युजिक प्लेबॅक टाईम देते. ही बॅटरी Helio G96 SoC सह एम्बेड केली असल्यामुळे एवढी शक्तीशाली आहे.

 

TECNO बद्दल थोडक्यात-
TECNO Mobile हा TRANSSION Holdings चा प्रीमियम स्मार्टफोन ब्रँड आहे. स्टॉप ॲट नथिंग हे तत्त्व बाळगून, TECNO जागतिक उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये कार्यरत आहे. TECNO विविध बाजारपेठेतील ग्राहकांच्या गरजासमजून त्यांना स्थानिक नवकल्पना प्रदान करते. TECNO चापोर्टफोलिओ जगभरातील 60 हून अधिक उदयोन्मुख बाजारपेठांमधील ग्राहकांसाठी बनवलेल्या स्मार्टफोन्स, स्मार्ट वेअरेबल आणि AIoT उपकरणांमध्ये पसरलेला आहे. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या
https://www.tecno-mobile.in/home/#/

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar