पतंजली योग समिती गोवा व भारत स्वाभिमानी यांच्या वतीने सिकेरी मये येथे स्वामी रामदेव यांचे शिष्य व मुख्य केद्रीय प्रभारी स्वामी परमार्थदेव यांचे सिकेरी येथील गोशाळेत योग शिक्षकांना व कार्यकर्ता ना मार्गदर्शन केले.
यावेळी युवा भारत चे केद्रीय प्रभारी आचार्य चंद्रमोहन, केद्रीय प्रभारी सचीन जी, भारत स्वाभिमान गोवा प्रभारी कमलेश बांदेकर, गोसेवा मंडळ प्रमुख कमलाकांत तारी, विश्वास कोरगांवकर, आदि उपस्थित होते.
याप्रसंगी स्वामी परमार्थदेव यांनी योग, आयुर्वेद, स्वदेशी, प्राकृतिक चिकित्सा, व भारतीय शिक्षणाचा हेतू यावर कार्यकर्ताना मार्गदर्शन केले. यावेळी आचार्य चंद्रमोहन, केद्रीय प्रभारी यांनी ही मार्गदर्शन केले.
यावेळी योग प्रशिक्षण शिबीर पुर्ण केलेल्या योग शिक्षकांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. सुरुवातीला कमलेश बांदेकर यांनी प्रास्ताविक केले तर संदेश बाराजणकर यांनी आभार मानले.
फोटो भारत बेतकेकर योग शिक्षक समवेत स्वामी परमार्थ देव आचार्य चंद्रमोहन, सचिन जी, कमलेश बांदेकर, कमलाकांत तारी, विश्वास कोरगांवकर व इतर.