युरी आलेमाव यांच्या निवडीचे फरेरा यांच्याकडून स्वागत, एकत्रित राहून पक्ष बळकट करण्याचा निर्धार

.

 

 

युरी आलेमाव यांच्या निवडीचे फरेरा यांच्याकडून स्वागत, एकत्रित राहून पक्ष बळकट करण्याचा निर्धार

पणजी ः कॉंग्रेस पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव यांची कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्याच्या निर्णयाचे हळदोण्याचे आमदार ऍड. कार्लुस आल्वारेस फरेरा यांनी स्वागत केले आहे. पक्षाच्या उर्वरित आमदारांसह पक्षला नवसंजीवनी देण्यासाठी तसेच पुन्हा मजबूती देण्यासाठी काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदीच्या शर्यतीबद्दल ते म्हणाले की, आम्ही तीन आमदार आहोत. तिघांपैकी कुणाचीही निवड झाली असती. आम्ही आमच्या उच्चस्तरीय नेत्यांशी चर्चा करून आमचे विचार व्यक्त केले. मी युरी यांची निवड झाल्याबद्दल आनंद झाला आहे. मी त्यांचे अभिनंदन करतो. कॉंग्रेस बळकट करण्यासाठी आम्ही एकत्र, एकसंध राहून काम करू, असे मी त्यांना सांगितले आहे. आमचे ध्येय हे पक्ष बळकट करण्याचे आहे. आम्ही एकत्र असून एकत्र राहून काम करू. केंद्रीय नेतृत्वाच्या निर्देशानुसार पुढे जाऊ. त्यांचे निर्णय मला मान्य आहेत व असतील, असे फरेरा म्हणाले.
तुमचे व आमचे असे वेगळे कार्य नाही. एकत्र राहून कार्य करायचे आहे. राजकारणात अनेक अपेक्षा असतात. अनेक महत्त्वाकांक्षा असतात परंतु, काही वेळा तुम्ही यशस्वी होता तर काही वेळा अपयशाची चव चाखावी लागते, असे फरेरा म्हणाले.
काही जणांना मला नेतेपदी पहायचे होते. परंतु, हे मोठे जबाबदारीचे व व्यापक काम आहे. या कार्यात राज्यातील ४० मतदारसंघावर लक्ष द्यावे लागते. ही जबाबदारी पडली असती तर माझ्या स्वतःच्या मतदारसंघाकडे दुर्लक्ष झाले असते, असे ते म्हणाले.
विजय सरदेसाई हे आपला गोवा फॉरवर्ड पक्ष कॉंग्रेस पक्षात विलीन करण्याच्या वृत्ताबद्दल ते म्हणाले की, तसे झाल्यास कॉंग्रेस पक्ष अधिक बळकट होईल.
विजय सरदेसाई हे मूळचे कॉंग्रेसचे नेते आहेत. त्यांच्यात आक्रमकता आहे. ते एकट्याने सध्या गोवा फॉरवर्ड पक्षाचे कार्य करत आहेत. आमची सध्या त्यांच्या पक्षासोबत युती आहे. वैचारिकदृष्ट्या त्याच्या व आमच्या पक्षाची विचारसरणी मिळती जुळती आहे. त्यामुळे आम्ही एकत्र आहोत. ते विद्यार्थी नेते असतानापासून मी त्यांना ओळखतो. ते पक्षात आल्यास आमचा पक्ष बळकट होईलय देशविघातक शक्तीशीं झुंज देण्यासाठी मदत होईल. देशाची लोकशाही मजबूत होईल, असे फरेरा म्हणाले.
कॉंग्रेसच्या आठ आमदारांनी पक्ष सोडून भाजपमध्ये दाखल झाल्याबद्दल ते म्हणाले की आम्ही आमची माहिती पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाला देऊ. त्यानंतर पक्ष निर्णय घेईल. यानंतर पुढील वाटचालीसाठी पक्ष काही ठोस निर्णय घेईल, असे ते म्हणाले.
आमच्या कॉंग्रेस पक्षाने देशावर व राज्यात अनेक वर्षे सरकार चालवले आहे. सुशासनासाठी कॉंग्रेसचे शासन ओळखले जाते. नवीन लोकांच्या नवीन आयडिया तसेच ज्येष्ठ्यांच्या अनुभवासह आम्ही पुढील वाटचाल करू, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar