जायट् ग्रुप ऑफ थिवी यांच्या वतीने माडेल थिवी येथील सरकारी प्राथमिक शाळेला पाण्याची टाकी व स्टैंड बांधून देण्यात आला.  

.

म्हापसा वाताहार

जायट् ग्रुप ऑफ थिवी यांच्या वतीने माडेल थिवी येथील सरकारी प्राथमिक शाळेला पाण्याची टाकी व स्टैंड बांधून देण्यात आला. 
या शाळेला पाण्याची समस्या होती व ती लक्षात घेऊन जायट् ग्रुप ऑफ थिवी ने पुढाकार घेऊन शाळेला पाण्याची टाकी दिली व सोबत स्टैंड उभारून दिला. जायट् ग्रुप ऑफ थिवी ने ही शाळा दत्तक घेतली असून त्या शाळेसाठी दरवर्षी शैक्षणिक साहित्य पुरविले जाते.
यावेळी जायट् ग्रुप ऑफ थिवी चे फेडरेशन दहा चे अध्यक्ष बसवराज पुजारी, माजी फेडरेशन ऑफ जायट् चे अध्यक्ष गणपत रायकर, जायट् ग्रुप ऑफ थिवी चे अध्यक्ष निलेश होडारकर, माजी फेडरेशन चे अध्यक्ष होनवाड,आदी उपस्थित होते
 केशव देशपांडे यांनी स्वागत केले तर निलेश होडारकर यांनी अशाच प्रकारचे सामना उपक्रम अन्य ठिकाणी राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. शाळेचे मुख्याध्यापक अशोक गावस, महंतेश गड्डी यावेळी उपस्थित होते. शिक्षिका स्नेहा कलंगुटकर यांनी आभार मानले.
फोटो भारत बेतकेकर  माडेल थिवी येथील सरकारी प्राथमिक शाळेला पाण्याची टाकी पुरवली त्यावेळी उपस्थित जायट् ग्रुप ऑफ थिवी चे अध्यक्ष निलेश होडारकर, बसवराज पुजारी, होनवाड, गणपत रायकर व इतर

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें