बालभवनमध्ये घुमटआरती प्रशिक्षण कार्यशाळा

.

 

बालभवनमध्ये घुमटआरती प्रशिक्षण कार्यशाळा

पणजी (पत्रक) यंदाच्या गणेशोत्सवाचे औचित्यसाधुन व पारंपारीक कलांचे जतन करण्याच्या हेतूने बालभवनतर्फे घुमट आरती प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.२३ सप्टेंबर ते २९सष्टेंबर २२ दरम्यान आयोजित केलेल्या या कार्यशाळेत बालभवनच्या ४२ सदस्य मुलांनी सहभाग घेतला होता. बालभवनच्या गणेशोत्सव कार्यक्रमात या मुलांनी बहारदार असे घुमट आरतींचे सादरीकरण केले.

याकार्यक्रमप्रसंगी बोलताना बालभवनचे संचालक श्री दयानंद चावडीकर यांनी या कार्यशाळेत सहभागी झालेल्या बालभवनच्या सदस्य मुलांचे कौतुक केले. घुमट हे गोव्यातील पारंपारीक वाद्य असून ही गोव्याच्या मातीतील कला पुढे नेण्यासाठी बालभवनचा मोलाचा वाटा असल्याचे सांगीतले.गणेशोत्सवाचा उत्साह आनंद मुलांमध्ये निर्माण करण्यासाठी बालभवन अशा कार्यशाळांच्या माध्यमातून महत्वाची भुमिका बजावत असून बालभवनमध्ये दिल्या जाणा–या या कलांचा शिक्षणाचा जास्तित जास्त मुलांनी लाभ घेण्याचे आवाहन केले.

बालभवनच्या या उपक्रमांचे सर्व स्तरातुन कौतुक करण्यात येत आहे.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar