बालभवन पणजीचा गणेशोत्सव 2022

.

बालभवन पणजीचा गणेशोत्सव 2022

पणजी (पत्रक) मुलांना आपल्या रूढी परंपराचे ज्ञान होउन या परंपरा जतन करण्याच्या उद्देशाने बालभवनमध्ये वेगवेळया सणांच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यंदाच्या गणेशोत्सवाचे औचित्य साधुन बालभवनचा गणेशोत्सव बालभवनच्या सदस्य मुलांसाठी तसेच विद्यालयातील मुलांसाठी साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना बालभवनचे संचालक श्री दयानंद चावडीकर यांनी हे कार्यक्रम सादर करण्यामागचा हेतू विशद केला. मुलानी आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगून व्यसनाच्याअधिन न होता भजनाच्या अधिन होउन बालभवन मध्ये शिकविल्या जाणा–या विविध कलांचा अवलंब करा असे प्रतिपादन केले. कलाअकदमीच्या बालभजन स्पर्धेत सहभाग घेतलेल्या बालभवन केंद्र,खांडेपार, बालभवन केंद्र, वेळगे, बालभवन केंद्र, नगरगांव, व बालभवन केंद्र नावेली, बालभवन केंद्र,मडगांव या सहभागी पथकांचे अभिनंदन केले.

यावेळी कला अकादमीच्या बालभजन स्पर्धेत तिसरे बक्षिस प्राप्त केलेल्या बालभवन केंद्र मडगांवच्या मुलांचा संचालक श्री दयानंद चवडीकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या मुलांनी पारंपारीक भजन सादरीकरण करून उपस्थित रसिकांची दाद मिळवली. तसेच बालभवनने आयोजित केलेल्या घुमट आरती कार्यशाळेत सहभागी विद्याथ्या©नी घुमट आरती सादरीकरण केले. यावेळी संचालक श्री दयानंद चावडीकर यांच्या हस्ते कार्यशाळेत सहभागी सर्व प्रशिक्षणार्थीना सहभाग प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.कार्यक्रमाचे सुत्रनिवेदन चैतन्य पांडे व अथर्व देशभंडारी यां बालभवनच्या मूलांनी केले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar