*संत समाज मयडे किशोर रामा साटेलकर यांची अध्यक्षपदी निवड*
म्हापसा ःधर्मभूषण प. पू. सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराजांच्या पावन अधिष्ठानाखाली देव, देश व धर्माचे कार्य करणाऱ्या श्री दत्त पद्मनाभ पीठ तपोभूमीतर्फे, सामाजिक विभागाकडून व पूज्य सद्गुरुंच्या आशीर्वादाने सन् २०२२ ते २०२५ साठी “संत समाज मयडे” नूतन समिती क्षेत्रीय प्रमुख सौ. वर्षा नार्वेकर यांच्या प्रमुखाखाली नियुक्त करण्यात आली. अध्यक्ष किशोर रामा साटेलकर, उपाध्यक्ष अजित मधु राऊळ, सचिव अॅड. शंकर आना गाड, सहसचिव समीर साळगावकर, खजिनदार संदीप नाईक, सहखजिनदार सोनू मांद्रेकर, सदस्य अक्षय ठाकूर, सदस्य पार्थ रेवोडकर,
सदस्या संध्या मांद्रेकर.
यावेळी संचालक दर्शन नार्वेकर, संचालिका निलीमा माद्रेंकर उपस्थित होते.
क्षेत्रीय प्रमुख वर्षा नार्वेकर यांनी प्रास्ताविक केले तर नवनियुक्त सचिव अॅड. शंकर आना गाड यांनी आभार मानले.
फोटो :-
मयडे ःसंचालक दर्शन नार्वेकर, निलिमा माद्रेंकर, क्षेत्रीय प्रमुख वर्षा नार्वेकर याच्या समवेत नवनियुक्त अध्यक्ष किशोर साटेलकर व समिती पदाधिकारी.