श्री.शांता विद्यालयात हिंदी दिवस उत्साहात
विद्याभारती संचालित सडये शिवोली येथील श्री. शांता विद्यालयामध्ये हिंदी दिवस मोठा उत्साहाने साजरा करण्यात आला यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.प्रजिता सांगाळे, शिक्षक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थीगण उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलाने करण्यात आली. हिंदी दिवसाचे औचित्य साधून शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वरचित हिंदी भाषेतील कविता सादर केल्या यामध्ये पाचवी ते सातवी या गटातील विद्यार्थिनी कुमारी श्रेयसी उमेश महालकर हिला पहिल्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले तर विद्यार्थिनी कुमारी साधना बेन हिला दुसऱ्या क्रमांकाचे बक्षिस मिळाले व विद्यार्थिनी कुमारी निरमा पुरोहीत हिला तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले तसेच विद्यार्थी कुमार अखिल लंगोटे याला उत्तेजनार्थ बक्षीस प्राप्त झाले तसेच इयत्ता आठवी ते दहावी या गटामधून विद्यार्थिनी कुमारी सुहाना शहा हिला पहिल्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले ,विद्यार्थ्यांनी कुमारी साजिया शहा हिला दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले व विद्यार्थिनी कुमारी शकुंतला शेळके हिला तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले व विद्यार्थी कुमार शाश्वत दुबे याला उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले. मुख्याध्यापिका सौ प्रजिता सांगाळे यांनी यावेळी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले. त्याच प्रकारे हिंदी भाषेचे महत्व शिक्षक श्री.उमेश महालकर यांनी विशद केले. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भिंक्ती पत्रकाचे यावेळी अनावरण करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी कुमारी तस्मिया तंदूर यांनी केले तर आभार प्रकटन विद्यार्थिनी कुमारी निरमा पुरोहित हिने केले