श्री.शांता विद्यालयामध्ये शिक्षक दिन उत्साहात

.

श्री.शांता विद्यालयामध्ये शिक्षक दिन उत्साहात

” शिक्षक केवळ पुस्तकी ज्ञान देत नसतो तर शिक्षकांकडून जीवन जगण्याची कला आत्मसात करायला मिळते. शिक्षक म्हणजे एक विशाल वृक्ष ज्यांच्या फांदी फांदीतून सळसळणारी ज्ञानाची पाने असतात”
असे प्रतिपादन शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री शशिकांत नाईक यांनी केले. विद्याभारती संचालित सडये शिवोली येथील श्री शांता विद्यालयामध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला यावेळी ते प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने व सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले .
या कार्यक्रमाला मुख्याध्यापिका सौ. प्रजिता सांगाळे , व्यवसायीक व समाजसेवक‌ श्री शिवशंकर मयेकर, श्री समीर कर्पे, श्री मंथकी देवळी ,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थीगण यावेळी या कार्यक्रमाला हजर होते. मुख्याध्यापिका सौ. प्रजिता सांगाळे यांनी मान्यवरांचा परिचय तसेच शब्द सुमनांनी त्यांचे स्वागत केले.
शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी खास सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. इयत्ता नववीच्या मुलांनी शिक्षकांना समर्पित समूहनृत्य सादर केले. तसेच इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षका प्रति कृतज्ञताभाव व्यक्त करणारे गीत सादर केले.
तसेच शिक्षक विद्यार्थ्यांसाठी , त्यांच्या उज्वल भवितव्यासाठी झटत असतो याचं प्रात्यक्षिक नाट्यीकरण रूपामध्ये विद्यार्थ्यांनी सादर केले.
तसेच विद्यार्थिनी कुमारी कशिश दाभोळकर यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व विशद केले. शिक्षक दिनाचे औचित्य साधून इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी हे एक दिवस शिक्षक दिन म्हणून शिक्षकी अनुभव घेतला यामध्ये उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून कुमार शाश्वत दुबे व विद्यार्थिनी कुमारी आफ्रिन खान यांना निवडण्यात आले तसेच उत्कृष्ट वेश परिधान म्हणून विद्यार्थी कुमार हर्षल सांगाळे व विद्यार्थिनी कुमारी समन खान यांना निवडण्यात आले,तसेच उत्कृष्ट विद्यार्थी शिक्षकेतर कर्मचारी म्हणून कुमार शाबुल्ला शहा यांना निवडण्यात आले.
तसेच श्री. शिवशंकर मयेकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. समीर कर्पे ,श्री. मंथन देवळी यांनी विद्यार्थ्यांसाठी आय.एन.एस विक्रांत यावर आधारीत‌ प्रेरणात्मक चित्रफीतीचे आयोजन करण्यात आले.
इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी खास मनोरंजक खेळांचे आयोजन केले होते या खेळांमध्ये सर्व शिक्षक वर्गाने उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला माजी मुख्याध्यापक श्री शशिकांत नाईक व शिक्षक नवनाथ सावंत विजयी ठरले
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी कुमारी आफ्रिन खान यांनी केले तर आभार प्रकटन विद्यार्थिनी कुमारी मुस्कान मंथगी हिने केले
या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी केले होते. कार्यक्रमाची सांगता शांतीपाठाने करण्यात आली.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar