क्रिकेट आयकॉन युवराज सिंग यांच्या गोव्यातील घरी त्यांनी एअरबीएनबी वर केले एका खास मुक्कामाचे आयोजन*

.

*क्रिकेट आयकॉन युवराज सिंग यांच्या गोव्यातील घरी त्यांनी एअरबीएनबी वर केले एका खास मुक्कामाचे आयोजन*

*युवराज सिंग एअरबीएनबी चे यजमान बनणारे, ठरले भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुपरस्टार*

भारत, २१ सप्टेंबर २०२२: आंतरराष्ट्रीय क्रिकेट आयकॉन युवराज सिंग एअरबीएनबी चे होस्ट बनत, भारतातील गोवा येथे त्यांच्या स्वतःच्या घरी सहा जणांच्या ग्रुपसाठी एक वेळ मुक्काम देत आहेत. पलीकडे समुद्राच्या नेत्रदीपक दृश्यांसह एका टेकडीवर वसलेले, सिंग यांचे घर गोव्याच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडविते. समुद्रकिनारे, अद्वितीय पाककृती आणि आदरातिथ्य यासाठी प्रसिद्ध असलेले गोवा राज्य भारत आणि जगभरातील पर्यटकांकडून सातत्याने व सर्वाधिक मागणी असलेले व आवडीचे ठिकाण आहे.

सिंग यांनी त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत उत्कृष्ट कामगिरी करून आपली कारकीर्द घडविली. आता ते एअरबीएनबी होस्ट करणारे भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रिकेटर बनून आणखी एक मैलाचा दगड उचलत आहेत. सहा पाहुण्यांना या क्रिकेटपटूच्या तीन बेडरूमच्या या हॉलिडे होममध्ये आत प्रवेश मिळेल, जिथे खेळपट्टीवरील त्यांच्या अनेक अर्थपूर्ण आठवणीं अनुभवायला मिळतील.

सिंग यांचे हे स्वीट होम आयएनआर १२१२* प्रति रात्र airbnb.com/yuvrajsingh वर बुक करता येईल. सिंग यांचा वाढदिवस आणि जर्सी क्रमांक – १४ ते १६ ऑक्टोबर २०२२ पर्यंत दोन रात्रींच्या मुक्कामासाठी हे घर उपलब्ध असेल.

“माझे गोव्यातील घर माझ्यासाठी नेहमीच खास आहे. माझे काम मला जगभर घेऊन जात असताना, या व्हिला मध्ये माझी पत्नी आणि मी आमच्या मित्र आणि कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्यासाठी एकत्र येतो. मी एअरबीएनबी होस्ट बनून भाग्यवान सहा जणांच्या गटासाठी माझ्या घराचे दरवाजे उघडण्यास उत्सुक आहे,” असे विचार युवराज सिंग यांनी शेअर केले.

‘व्हिला”बद्दल थोडेसे :

डोंगरमाथ्यावरील उंच ठिकाणावरून, १८० पॅनोरमा अँगलमध्ये ह्या व्हिलावरून समुद्र निसर्गाचे दर्शन घडते. विहंगम दृश्यांसह, ‘कासा सिंग’ वरून सूर्योदयावेळी रंगीबेरंगी व आकर्षित दिसणारे गावांवर पडलेले सोनेरी ऊन मन शांत करते.

विस्तीर्ण डेक आणि टेरेस हे कुंडीतली फुलझाडे आणि हिरवळीने पसरलेले आहे, यात बोगनविल आणि इतर रंगबीरंगी फुले आहेत. आलिशान पूलमध्ये स्विम अप बार आणि दुपारसाठी वाचन किंवा आरामात जेवणाचा आनंद घेण्यासाठी अनेक जागा आहेत.

मुख्य मेझानाइन जागेच्या अगदी जवळ असलेल्या जेवणाच्या खोलीत स्थानिक गोव्याचे पदार्थ घरच्या वैयक्तिक आचारीद्वारे बनवून दिले जातील. हे घर सिंग यांच्या कुटुंबाच्या फोटोंनी भरले आहे. त्याचबरोबर त्यांच्या पहिल्या ओडीआय १५० सह – अनेक क्रिकेट पुरस्कारांनी सजविलेले आहे.

“आम्ही क्रिकेट आयकॉन युवराज सिंग यांच्यासोबत एअरबीएनबी चे होस्ट म्हणून ‘वन टाईम स्टे’ भागीदारी करताना खूप खुश आहोत. आंतरराष्ट्रीय प्रवास पुन्हा जोरात सुरू असताना, हा अविस्मरणीय अनुभव जागतिक प्रेक्षकांना देताना आणि सिंग यांना भारतातील आमच्या यजमान समुदायात जोडताना आम्हाला आनंद होत आहे,” असे एअरबीएनबीचे भारत, दक्षिणपूर्व आशिया, हाँगकाँग आणि तैवानचे महाव्यवस्थापक अमनप्रीत बजाज म्हणाले.

मुक्कामाबद्दल:

समुद्राजवळील शांत लयीत मग्न होण्यासाठी, अतिथींना ‘कासा सिंग’मध्ये विशेष प्रवेश असेल. मुक्कामाच्या घटकांमध्ये खातील गोष्टी समाविष्ट आहेत:

– आगमनानंतर युवराज सिंग यांच्याकडून व्हर्च्युअल पद्दतीने अभिवादन
– सिंग यांच्या गोव्यातील आवडत्या हँगआउट स्पॉट्स शेअर करणारी स्वागत टिप
– नयनरम्य दिवार बेटावर ई-बाईकवर सहल, खारफुटीचे शेत, चर्च, मंदिरे आणि सुंदर घरे यातून फिरण्याचा अनुभव
– युवराज यांच्या आयकॉनिक इनिंगचे स्क्रीनिंग – क्रिकेटरच्या घरी त्या क्षणांचे पुनरुज्जीवन
– मुक्कामाला असेपर्यंत युवराज यांचे आवडते स्थानिक पदार्थ
– युवराज यांच्याकडून वैयक्तिकृत स्मरणिका

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar