आसगांव युनियन मध्ये हिन्दी दिवस साजरा

.

आसगांव युनियन मध्ये हिन्दी दिवस साजरा.
आसगांव येथील आसगांव युनियन हायस्कूल मध्ये हिन्दी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमाला विध्या प्रबोधिनी विद्यालयाचे शिक्षक प्रो. कुलदीप कामत हे प्रमूख अतिथी या नात्याने उपस्थित होते. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. श्रीधर नाईक यांनी प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. स्वागत गीताने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. उपस्थित मान्यवर मुख्य अतिथी कुलदीप कामत , मुख्याध्यापक श्री श्रीधर नाईक, वरिष्ठ शिक्षिका मर्लीन मिरांडा शारीरिक शिक्षक अमित विर्नोडकर यांनी दिपप्रज्वलन केले. इयत्ता ९वी च्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले व ८वी च्या विद्यार्थ्यांनी नाटक सादर केले. तदनंतर हिन्दी कविता लेखन स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यातील विजेते क्रुष्णा कुमार, अनाली नाईक, धर्मानंद सावंत, अक्षता अनवटी व पुष्पेंद्र यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण केले. हिन्दी शिक्षिका सौ. दिप्ती कुबल यांनी हिंदी दिवसाचं महत्व विद्यार्थ्यांना स्पष्ट करून सांगितले. प्रमुख पाहुण्यांनी आपल्या संदेशात विद्यार्थ्यांना हिन्दी भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी सातत्याने वाचन व मनन करणे किती आवश्यक आहे हे समजावून सांगितले व विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थी क्रृष्ण कुमार व डायहालीमा बोमानहली यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शेवटी त्रिशांतजीत घोष यांनी कार्यक्रमास उपस्थितांचे आभार मानले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar