फोंडा येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनाद्वारे मागणी हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह यांची कारागृहातून त्वरित मुक्तता करा

.


फोंडा येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनाद्वारे मागणी
हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह यांची कारागृहातून त्वरित मुक्तता करा !

फोंडा, २४ सप्टेंबर – तेलंगाणा येथील गोशामहल विधानसभा मतदारसंघातील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह यांना 23 ऑगस्ट 2022 या दिवशी अटक करण्यात आली. त्यांच्यावर एका पंथीयांच्या श्रद्धास्थानांचा कथित अवमान केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी न्यायालयाने त्यांना जामीनही दिला आहे. त्यानंतर त्यांना अन्य एका जुन्या प्रकरणात पुन्हा 25 ऑगस्ट 2022 या दिवशी अटक करण्यात आली. आमदार टी. राजा सिंह यांच्यावर जुन्या प्रकरणाचे खटले दाखल करून त्यांना तुरुंगात डांबण्याचा कुटील डाव रचला जात आहे, तसेच त्यांना जिहादी प्रवृत्तीच्या धर्मांधांकडून जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. या प्रकरणी जिवे मारण्याच्या धमक्या देणार्‍यांवर कठोर कारवाई करावी, तसेच आमदार टी. राजा सिंह यांच्या घटनात्मक अधिकारांचे रक्षण होण्यासाठी त्यांना कारागृहातून मुक्त करावे, अशी मागणी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी क्रांती मैदान, फोंडा येथे हिंदू राष्ट्र-जागृती आंदोलनात केले. देशव्यापी हिंदु राष्ट्र्र-जागृती आंदोलनाचा हा एक भाग होता. आंदोलनामध्ये ‘केसारिया हिंदू वहिनी’, ‘शिवयोद्धा संघटना’, ‘गोमंतक मंदिर महासंघ’, ‘राष्ट्रीय हिंदू युवा वहिनी’, ‘हिंदू महा आघाडी’. ‘हिंदु जनजागृती समिती’ आणि ‘सनातन संस्था’ या संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
प्रारंभी हिंदुत्वनिष्ठांनी आंदोलनाला संबोधित केले आणि या मार्गदर्शनांतून पुढील सूर उमटला. तेलंगाणामध्ये हिंदु देवदेवतांवर अश्लाघ्य भाषेत टीका करणारा हिंदुद्वेषी कथित विनोदी कलाकार मुनव्वर फारुकी याच्या कार्यक्रमाला अनुमती देऊ नये अशी मागणी आमदार टी. राजासिंह यांनी सातत्याने केली होती; मात्र त्यांच्या मागणीला केराची टोपली दाखवत पोलीस संरक्षणात त्याचा कार्यक्रम पार पडला. यानंतर टी. राजा सिंह यांनी एक व्हिडिओ प्रसारित केला. यानंतर जिहादी प्रवृत्तीचे आमदार, पदाधिकारी आदींनी थेट कायदा हातात घेण्याची चिथावणी दिली. अशांवर कठोर कारवाई करावी. तेलंगाणामध्ये ‘तेलंगाणा राष्ट्र समिती’चे सरकार अल्पसंख्यांकधार्जिणे असल्याने तेथे केंद्रीय गृह खात्याने लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी. आमदार टी. राजा सिंह यांच्यावरील सर्व खटले महाराष्ट्र, कर्नाटक किंवा गोवा या बाजूच्या राज्यांत हस्तांरित करावेत. आंदोलनामध्ये ‘केसारिया हिंदू वहिनी’चे सर्वश्री राजीव झा, ‘गोमंतक मंदिर महासंघाचे’ जयेश थळी आणि हिंदु जनजागृती समितीचे सत्यविजय नाईक यांनी विषय मांडला. कार्यक्रमाच्या शेवटी हिंदु जनजागृती समितीचे दक्षिण गोवा समन्वयक श्री. सत्यविजय नाईक यांनी ठराव मांडले. कार्यक्रमाच्या प्रारंभी आंदोलनाचा उद्देश, तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सत्यविजय नाईक यांनी केले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar