वाताहार मुळगाव येथील सरकारी हायस्कूल मध्ये जायट् ग्रुप ऑफ थिवी तफै शिक्षक वासुदेव दिवकर व शिक्षिका रुपाली अणवेकर यांचा जायट् फेडरेशन दहा चे अध्यक्ष बसवराज पुजारी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. 

यावेळी व्यासपीठावर जायट् ग्रुप ऑफ थिवी चे अध्यक्ष निलेश होडारकर, बसवराज पुजारी, जायट् फेडरेशन दहा चे माजी अध्यक्ष विजय कुमार होनवाड, जायट् फेडरेशन दहा चे माजी अध्यक्ष गणपत रायकर, केशव देशपांडे आदी उपस्थित होते.
तसेच या वेळी जायट् ग्रुप ऑफ थिवी नै पृथ्वी वाचवा याविषयावर घेतलेल्या प्रश्न मंजुषा स्पर्धातील विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. या स्पर्धेत साहिल नाईक याला प्रथम क्रमांक प्राप्त झाला तर अर्जुन गावकर व तनवी गावकर याना द्वितीय क्रमांक विभागुन देण्यात आला. वृंदा सिद्धये व विशाखा गावडे यांनी उतेजनार्थ बक्षिसे देण्यात आली
मान्य वराच्या हस्ते विद्यार्थीना ट्रॉफी व प्रमाणपत्रे देण्यात आली. प्रमुख पाहुणे बसवराज पुजारी यांनी यावेळी पर्यावरणाचे महत्त्व सांगताना प्लास्टिकचा वापर कमीत कमी करावा जेणेकरून निसर्गाचे रक्षण होईल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिसीलीया फनाडिस हिने केले तर तेजा परब हिने स्वागत केलं
गणपत रायकर यांनी आभार मानले. जायट् ग्रुप ऑफ थिवी ने यावर्षी पाच हायस्कूल मध्ये प्रश्न मंजुषा स्पर्धा घेतली होती आणि त्याना उत्तम प्रतिसाद मिळाला. एकूण ३०० विद्यार्थीनी या स्पर्धेत भाग भाग घेतला होता. रेवाडा,वजरी, मुळगाव, कोलवाळ व पिर्ण येथील हायस्कूल मध्ये प्रश्न मंजुषा स्पर्धा घेतली होती.
फोटो भारत बेतकेकर मुळगाव येथील सरकारी हायस्कूल च्या मुलासमवेत बसवराज पुजारी, निलेश होडारकर, गणपत रायकर, विजय कुमार होनवाड