स्नॅक्सचा अनुभव वृध्दींगत करण्यासाठी ब्रिटानिया तर्फे नवीन क्रासाँट ची सुरुवात

.

तुमच्या स्नॅक्सचा अनुभव वृध्दींगत करण्यासाठी ब्रिटानिया तर्फे नवीन क्रासाँट ची सुरुवात

India, २०२२- ब्रिटानिया इंडस्ट्रीज लिमिटेड या भारतातील सर्वांत मोठ्या बेकरी खाद्य कंपनी ने आता पाश्चिमात्य स्नॅकिंग क्षेत्रात पदार्पण करत नवीन ट्रिट क्रासाँट ची सुरुवात केली आहे. ग्राहकांना ‘एक्सायटिंग गुडनेस’ देण्याचे आपले वचन पूर्ण करण्यासाठी ब्रॅन्ड कडून क्रासाँट या प्रसिध्द युरोपियन स्नॅक ला आता भारतीयांसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहे. ब्रिटानिया ट्रिट क्रासाँट आता कोको, व्हॅनिला आणि मिक्स्ड फ्रूट या तीन स्वादात रु २० पासून सुरू होणार्‍या किंमतीत उपलब्ध आहे.

ब्रिटानिया ने ट्रिट क्रासाँट साठी नवीन जाहिरात सुरू केली असून तिची संकल्पना ही लोवे लिंटास ची आहे. या मोहिमेचे नामकण ‘डोन्ट डेअर कम्पेअर’ असे असून या अंतर्गत उत्पादनाकडून अधिक चांगला स्नॅकिंगचा अनुभव देण्याची संकल्पना अधोरेखित करण्यात येत आहे. फिल्मची सुरुवात ही अशी आहे की दोन कॉलेज तरुणी पायर्‍यांवर बसल्या आहेत आणि त्यांतील एक नेहमीचा स्नॅक तर दुसरी ब्रिटानिया ट्रिट कासाँटचा आनंद घेत आहे. साधारण स्नॅक खाणारी मुलगी म्हणते की सर्व स्नॅक्स हे सारखेच असतात. त्यावर दुसरी मुलगी उत्तर देते की ब्रिटानिया क्रासाँट हा अतिशय स्वादिष्ट असा स्नॅक असून त्याची चव कोणत्याही तुलनेच्या पलिकडची आहे. या मोहिमे मध्ये सेलिब्रिटी नट आणि दिग्दर्शक – प्रभू देवा आपल्याला दिसणर आहे. प्रभूदेवा हे त्यांच्या चपळ अशा मुव्ह्ज आणि प्रेमळ व्यक्तिमत्वासाठी प्रसिध्द आहेत. टिव्हीसी ची सांगता ही व्हॉईस ओव्हर “दि ब्रॅन्ड न्यू ब्रिटानिया ट्रिट क्रासाँट्स – फ्लफी, बेक्ड ॲन्ड फिल्ड विथ रीच लिक्विड क्रीम, डोन्ट डेअर कम्पेअर!” ने होते.

ब्रिटानिया ट्रिट क्रासाँटच्या सुरुवाती विषयी बोलतांना ब्रिटानिया इंडस्ट्रीज ‍लिमिटेडचे चीफ बिझनेस ऑफिसर – न्यू कॅटेगरीज बदरी बेरिवाल यांनी सांगितले “ ब्रिटानिया मध्ये आम्ही नेहमीच सर्व पिढ्यांमधील ग्राहकांसाठी अनोखे स्नॅक्स उपलब्ध करुन देत असतो. आमचे नाविन्यपूर्ण उत्पादन म्हणजे ऑल न्यु ब्रिटानिया क्रासाँट हे उत्पादन प्रसिध्द युरोपिन स्नॅक क्रासाँट कडून प्रोत्साहन घेऊन तयार करण्यात आले आहे. आमचा असा विश्वास आहे की
आजची तरुणाई ही खूपच प्रयोगशील आहे आणि जगभरांतील नवनवीन चवींचा अनुभव घेते. एक ब्रॅन्ड म्हणून ब्रिटानिया ने नेहमीच भारतात पुढील पिढीतील स्नॅक्स आणण्यावर जोर दिला आहे. आज हेच ध्येय साध्य करण्यासाठी आणि जगभरांतील नवनवीन उत्पादने देशभरांतील आमच्या ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देण्यासाठी आमच्या मजबूत वितरण नेटवर्क चा वापर करत आहोत. न्यू ब्रिटानिया ट्रिट क्रासाँट हे उत्पादन म्हणजे चव आणि सोपेपणा यांचे योग्य मिश्रण ग्राहकांसाठी उपलब्ध करुन दिले जात आहे. रांजणगाव येथील आमच्या मेगा फूट टेक पार्क मध्ये उत्पादित करण्यात येणारे आंतरराष्ट्रीय स्तरावरील आणखी एक उत्पादन आहे.”

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar