पी.एफ्.आय.’वर बंदी घालण्याचा केंद्रसरकारचा निर्णय स्वागतार्ह !*

.

 

*‘पी.एफ्.आय.’वर बंदी घालण्याचा केंद्रसरकारचा निर्णय स्वागतार्ह !*

*नवरात्रीत ‘पीएफआय’सह नऊ राक्षसांना संपवले; आता ‘एस्.डी.पी.आय.’वर बंदी घालून ‘दसरा’ साजरा करावा !* – हिंदु जनजागृती समितीचे केंद्र सरकारकडे मागणी

केंद्र सरकारने ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ अर्थात् ‘पी.एफ्.आय.’वर बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायद्याद्वारे (UAPA) बंदी घातली, या निर्णयाचे हिंदु जनजागृती समिती स्वागत करते. ‘पी.एफ्.आय.’चा अनेक राष्ट्रविरोधी आणि आतंकवादी कारवायांमध्ये, तसेच हिंदु नेत्यांच्या हत्यांमध्ये सहभाग आढळून आला आहे. हिंदु जनजागृती समितीने गेली काही वर्षे आंदोलने, निवेदने, सोशल मिडीया कॅम्पेन आदींच्या माध्यमांतून ‘पी.एफ्.आय.’वर बंदी घालण्याची मागणी लावून धरली होती. देशात नवरात्री चालू आहे आणि त्यातच ‘पी.एफ्.आय.’सह नऊ राक्षसी जिहादी संघटनांना संपवण्यात आले आहे. *आता ‘पी.एफ्.आय.’ची राजकीय संघटना असलेल्या ‘एस्.डी.पी.आय.’वर बंदी आणून ‘दसरा’ साजरा करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे.*

काही वर्षांपूर्वी केंद्र सरकारने डॉ. झाकीर नाईक याच्या ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’वर बंदी घालत त्याला फरार आतंकवादी घोषित केले होते; मात्र याच आतंकवाद्याची ट्वीटर आणि फेसबुक या सामाजिक माध्यमांवर ५० हून अधिक खाती चालूच आहेत. याचप्रकारे आता ‘पी.एफ्.आय.’ आणि संलग्न संस्था यांवर जरी बंदी आणली असली, तरी त्यांचीही ट्वीटर आणि फेसबुक खाती अजूनही चालू आहेत. या बंदीमुळे आतंकवादी कारवाया नक्कीच थांबतील; मात्र आतंकवादी विचारसरणी पसरवण्याचे कार्य चालूच राहिल. जर यांचा सोशल मिडीयावर दहशतवादाचा प्रसार चालू राहिला, तर देशात अराजक माजवण्यासाठी त्याचा वापर होईल आणि प्रत्यक्ष घातलेल्या या बंदीला काही अर्थ रहाणार नाही. त्यामुळे ‘पी.एफ्.आय.’ आणि तिच्याशी संलग्न सर्व संघटनांची ट्वीटर आणि फेसबुक, तसेच अन्य सोशल मिडीया अकाऊंटही तत्काळ बंद केली पाहिजेत, अशी आमची आग्रही मागणी आहे.

पुण्यात नुकतेच ‘पी.एफ्.आय.’च्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले, त्यामध्ये ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या होत्या. असे प्रकारही आता मोठ्या प्रमाणात होतील. तरी अशा घोषणा देणार्‍यांवरही देशद्रोहाचे खटले दाखल करावेत, अशीही समितीने मागणी केली आहे.

आपला नम्र,
*श्री. रमेश शिंदे,*
राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती.
(संपर्क : 99879 66666)

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar