हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्तीच्या निमित्ताने गोव्यात ठिकठिकाणी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी हिंदु धर्मियांनी केल्या प्रतिज्ञा

.

 

 

*हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्तीच्या निमित्ताने गोव्यात ठिकठिकाणी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी हिंदु धर्मियांनी केल्या प्रतिज्ञा*
पणजी, २८ सप्टेंबर – राष्ट्र आणि धर्मरक्षणार्थ कृतीशील असलेल्या हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्तीच्या निमित्ताने नवरात्रोत्सव काळात हिंदु धर्मियांनी राज्यात ठिकठिकाणी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रतिज्ञा केल्या.
धर्मजागृती, धर्मशिक्षण, हिंदुसंघटन, धर्मरक्षण आणि राष्ट्ररक्षण या ध्येयपूर्तीसाठी अविरतपणे कार्य करणार्‍या हिंदु जनजागृती समितीची स्थापना ७ ऑक्टोबर २००२ या दिवशी अर्थात् आश्विन शु. प्रतिपदा म्हणजे नवरात्रीच्या घटस्थापनेच्या शुभदिनी झाली होती. यानिमित्ताने हिंदु जनजागृती समितीने ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियाना’चे आयोजन केले आहे. या अभियानाच्या अंतर्गत ठिकठिकाणी व्याख्याने घेणे, ‘हिंदु राष्ट्र प्रतिज्ञा’ घेणे, ‘हिंदु राष्ट्र परिसंवादा’चे आयोजन करणे, महिलांसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्गांचे आयोजन करणे, सामुहिकरित्या श्री दुर्गादेवीचा नामजप करणे आदींबरोबरच हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी सामूहिक प्रतिज्ञा घेण्यात येत आहेत. या निमित्ताने श्री सातेरी ब्राह्मणी महादेव देवस्थान, बेतकेकरवाडा, वाळपई; उसकई, बार्देश येथे एका कार्यक्रमात; हुडोवाडा, कायसुव येथील श्री सातेरी मंदिर; श्री सिद्धीविनायक मंदिर, हाऊसिंग बोर्ड, मडगाव; श्री गणपति मंदिर, मुरगन, मडगाव; श्री राष्ट्रोळी मंदिर, सीम, खोर्ली; श्री शिवनाथनगर मंदिर, साईनगर, वेर्ला, काणका; म्हापसा येथे श्री राष्ट्रोळी मंदिर, सीम, म्हापसा आदी ठिकाणी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी उपस्थित हिंदु धर्मियांनी प्रतिज्ञा घेतल्या. म्हापसा येथे एका ठिकाणी प्रतिज्ञा घेतांना ‘स्वराज्य संघटने’चे सर्वश्री प्रशांत वाळके, गोमंतक मंदिर महासंघाचे जयेश थळी, मडगाव येथे श्री गणपति मंदिराचे अध्यक्ष आदी मान्यवरांनी सहभाग घेतला. राज्यातील विविध नवरात्रोत्सव मंडळ, श्रीकृष्णपूजन मंडळ आणि विविध मंदिरे मिळून २५ हून अधिक ठिकाणी अशा प्रतिज्ञा घेण्याचे नियोजन आहे.

आपले नम्र,
*डॉ. मनोज सोलंकी, राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती*
संपर्क क्रमांक – ९३२६१०३२७८

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar