खोर्ली-म्हापसा येथील सारस्वत विद्यालयाच्या प्राथमिक विभागातील विद्यार्थी ‘पोषण माह’ उपक्रमाच्या अंतर्गत भोजनाचा आस्वाद घेताना.

.

 

खोर्ली-म्हापसा येथील सारस्वत विद्यालयाच्या प्राथमिक विभागातील विद्यार्थी ‘पोषण माह’ उपक्रमाच्या अंतर्गत भोजनाचा आस्वाद घेताना.

 

सारस्वत विद्यालयात ‘पोषण मास’ उपक्रम

म्हापसा, दि. २८ (प्रतिनिधी) :

खोर्ली-म्हापसा येथील सारस्वत विद्यालयाच्या प्राथमिक विभागात ‘पोषण माह’ उपक्रमाच्या अंतर्गत विविधांगी उपक्रम राबवण्यात आले.

यासंदर्भात बोलताना विद्यालयाच्या मुख्याध्यापिका स्वप्नीला नागवेकर म्हणाल्या, सरकारच्या पौष्टिक आहार योजनेच्या अंतर्गत वर्गावर्गातून नाचणी सत्त्व, फळांचे सॅलड, पौष्टिक भेळ, लिंबू सरबत इत्यादी खाद्यजिन्नस मुलांचा सहभाग घेऊन बनवण्यात आले आणि त्याचाच एक भाग म्हणून इयत्ता पहिली ते चौथीच्या सर्व मुलांना संपूर्ण जेवणाचा आस्वाद घेता आला. त्यामध्ये भात, आमटी, भाजी, मोड आलेल्या मुगांची कोशिंबीर, फळे, सोजी, सुका मेवा इत्यादी खाद्यपदार्थांचा समावेश होता.

आजकालच्या मुलांना बाहेरचे खाण जास्त आवडते. म्हणूनच मुलांना घरी बनवलेल्या अन्नाचे महत्त्व कळावे, पौष्टिक आहार का घ्यावा हे समजावे हा या उपक्रमाचा उद्देश होता. पंक्तीत बसून सहभोजनाचा आनंद, पानात अन्न टाकू नये हे संस्कार मुलांवर नकळतपणे बिंबवण्यात आले, असेही स्वप्नीला नागवेकर यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar