जेडी इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नोलॉजी समर्थित जेडी स्कूल ऑफ डिझाईनचा पदवीदान समारंभ
गोवा, सप्टेंबर २०२२ ः जेडी इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नोलॉजी समर्थित जेडी स्कूल ऑफ डिझाईन इन्स्टिट्यूटमधून विविध अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या पदवीप्राप्त विद्यार्थ्यांसाठीचा पहिला पदवीदान समारंभ झाला आहे.
फॅशन डिझाईन तसेच इंटिरियर डिझाईन संबंधितांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
या भव्य समारंभात विद्यार्थ्यांना इन्स्टिट्यूटच्या मान्यवरांकडून प्रमाणपत्रे लाभली आहेत. व्यावसायिक जगात पाऊल ठेवण्यापूर्वी त्यांची ही मिळकत आहे. ‘ग्रॅज्युएशन डे’ हा दिवस म्हणजे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी कॉलेज जीवनाचे दिवस पुन्हा जगण्याची संधी आहे.
या विशेष दिवसाबद्दल बोलताना संचालक-दक्षिण सँड्रा ऍग्नेस डिसोझा यांनी त्यांचे त्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल अभिनंदन केले. त्या म्हणाल्या की, आज ३३ विद्यार्थी जेडी गोवा संकुलातून पदवी मिळवत असल्याचा अभिमान आहे. तुम्ही सर्व जेडी कुटुंबाचे भाग आहात. कॉलेजच्या बाहेर गेल्यावरही तुम्ही पुन्हा कॉलेजमध्ये याल अशी अपेक्षा आहे. आम्ही या उद्योगाशी जोडणे आवश्यक आहे, असे जेडी इन्स्टिट्यूटला वाटते. नवीन प्रकल्प, नवीन अभिहस्तांकन किंवा उपक्रमशीलतेचा तुम्ही भाग व्हा, जेणेकरून सर्वांची वाढ होण्यास मदत होईल. तुमचे प्रकल्प तुम्ही कॉलेजमध्ये येऊन मोफत करा, असे आम्ही तुम्हाला निमंत्रण देतो.
यशाचा प्रवासादरम्यानचे सर्व उपलब्धी, उर्जा आणि कठोर परिश्रम साजरे करण्याचा हा दिवस आहे.आम्ही सर्वजण पहिला पदवीदान समारंभ साजरा करण्यासाठी आणि आमच्या ‘जेडीयन्स’च्या यशाचा आनंद घेत आहोत. डिझाईन उत्साही विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात पाऊल ठेवल्यापासून या एका दिवसाची आम्ही सर्वजण वाट पाहत होतो. प्रत्येक टप्प्यावर त्यांना मिळालेले यश पाहून आम्हाला अभिमान झाला आहे. मार्गदर्शक व संस्थात्मक कार्यक्रमांद्वारे मिळालेले ज्ञान घेऊन ते या जगात वावरण्यास सज्ज झाले आहेत. यासाठी मला त्यांचे अभिनंदन करायचे आहे,
आमच्या विद्यार्थ्यांचे यश संस्था देत असलेल्या दर्जेदार शिक्षणाची पुष्टी करते. आम्हाला आशा आहे की आमचे ‘जेडीयन्स’ सर्जनशीलतेसह डिझाइनच्या क्षेत्रात उतरतात आणि नवीन कार्यक्षेत्रात अन्वेषण करता, असे जेडी एज्युकेशनल ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्वस्त नीलेश दलाल यांनी सांगितले.
जेडी इन्स्टिट्यूट गोवाचे प्राचार्य उमेश नाईक यांनी संपूर्ण व्यवस्थापनाला कृतज्ञता व्यक्त केली. आजच्या दिवशी मी सर्व पदवीप्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतो व भविष्यासाठी त्यांना सुयश चिंतितो. माझे सहकारी सदस्य, स्टाफ सदस्य व व्यवस्थापन संघातील सर्वांचे इन्स्टिट्यूटच्या शैक्षणिक वाटचालीत सहकार्य केल्याबद्दल आभार मानतो.
जेडी स्कूल ऑफ डिझाईनच्या पदवीदान समारंभात या वर्षीच्या ३० पदवीधरांना पदव्या दिल्या जातील. जेडी इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नोलॉजी ही समर्थित संस्था गोवा विद्यापीठाशी संलग्नित आहे. डिझाईन मीडिया, कला या संबंधी विविध अभ्यासक्रम ही संस्था घेते.
जेडी इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नोलॉजी बद्दल:
जेडी इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नोलॉजी डिझाईन क्षेत्रात सेवा देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली. आपल्या ३४ वर्षांच्या निर्दोष वारशाने, संस्थेने उद्योगाला अनेक महान दिग्गज दिले आहेत. तसेच विकसित होणारी डिझाईन सरावाची सवय लावली आहे. विशिष्टता, नवीनता आणि टिकाऊपणा ही सूत्रे इन्स्टिट्यूटसाठी महत्त्वाची आहेत. विद्यार्थ्यांना डिझाईनच्या विविध क्षेत्रातील गुंतागुंत समजण्यास मदत करणे आणि त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रात चांगली कामगिरी करण्यासाठी त्यांना योग्य ज्ञान देखील प्रदान करून करियरला चालना देण्याचे कार्य संस्थेने केले आहे.
जेडी स्कूल ऑफ डिझाइन बद्दल:
जेडी स्कूल ऑफ डिझाईनचे उद्दिष्ट जागतिक दर्जाचे शिक्षण इच्छुक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे आहे. डिझाइन, मीडिया आणि कला क्षेत्रात
विविध सर्जनशील सहयोगांमध्ये संस्था कार्य करत आहे. विद्यार्थी-मेंटर कार्यक्रम, शोध, क्रिएटिव्ह कार्यक्रमक, प्रकल्पभिमूक शिक्षण, स्टेट ऑफ आर्ट तंत्रज्ञान संस्थेकडे असून बंगळुरू सिटी युनिव्हर्सिटी व गोवा विद्यापीठाशी संलग्नता आहे.
श्वेता कोरगावकर
दूरध्वनी क्रमांक ः + ९१ ९०२१९००४०