जेडीएसडी बनला ‘एचआयडीई’चा ज्ञान सहयोगी
गोवा, सप्टेंबर २०२२ः जेडी स्कूल ऑफ डिझाईन गोवा ही २०२२ एचआयडीई- इंटिरियर अँड डिझाईन एक्स्पो २०२२ साठीची ज्ञान भागीदार आहे. हा एक्स्पो म्हणजे निर्माणक उद्योगाला त्यांच्या उद्योगाच्या विकासासाठी व नफा मिळवून देण्याबरोबरच ग्राहकांसोबत भक्कम नाते निर्माण करण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध करून देणारा कार्यक्रम आहे.
जेडी स्कूल ऑफ डिझाईनची एचआयडीई सोबतची भागीदारी ही रचना, कला व प्रसारमाध्यमांशी निगडीत शैक्षणिक क्षेत्रात सक्रीय संस्थेची दूरदृष्टी दर्शवते. जेडी इन्स्टिट्यूट समर्थित या संस्थेला ३० वर्षांचा वारसा लाभला आहे. रचना उद्योगाला अनेक नामांकित चेहरे देेताना उत्कट डोक्यांना सेवादेखील पुरवली आहे.
एचआयडीई हा फर्निचर, फर्निशिंग, इंटिरियर, प्रकाशयोजना, डिझाईन या आदरातिथ्य उद्योगाशी संबंधित ताज्या ट्रेंडस्चा अनन्य मेळा आहे. यामध्ये वेगवेगळे परिसंवाद व उद्योगाशी संबंधित विविध प्रक्रियांवरील पॅनेल चर्चांचा देखील समावेश असेल. हा इव्हेंट ३० सप्टेंबर रोजी सुरु होणार असून २ ऑक्टोबरपर्यंत ताळगाव, पणजी सभागृहात सुरू राहणार आहे.
या इव्हेंटचे उद्घाटन ३० सप्टेंबर रोजी जेडी इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नोलॉजी गोवाच्या साहायक प्राचार्य व फॅशन अँड ऍपेरल डिझाईन विभागाच्या प्रमुख नेसा वाझ यांच्या हस्ते यजमान या नात्याने होणार आहे. याव्यतिरिक्त जेडी इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नोलॉजी, बंगलोरच्या इंटिरियर अँड डेकोरेशन विभागाचे प्रमुख डॉ. निश्चय गौडा, जेडी इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नोलॉजी, बंगलोरच्या डायरेक्टर साऊथ सँड्रा ऍग्नेस डिसोझा यांच्यासह मार्केटमधील अनेक तज्ज्ञ हे इंटिरियर्स या क्षेत्रातील रीत टिकवण्याबाबत आपली मौल्यवान मते व्यक्त करणार आहेत.
जेडीएसबी देत असलेल्या दर्जेदार शिक्षणाला दाखवण्याची ही संधी आहे. जागतिक अध्यापनशास्त्रात सैध्दांतिक शिक्षणासह प्रयोगधिष्टित शिक्षण देण्यासाठी ही इन्स्टिट्यूट ओळखली जाते.
एचआयडीई सोबतच्या भागीदारीसह इन्स्टिट्यूटच्या डिझाईन क्षेत्रातील अद्ययावत राहण्याचा कल दिसून येतो. शिक्षण घेणार्यांपर्यंत हा कल पोहोचवण्याचा उद्देश आहे. डिझाईन उद्योगाशी संबंधित समुदाय व सर्जनशील मेंदूला आवश्यक ज्ञान व मार्केट उद्भासन देणे यामुळे शक्य होत आहे.
‘ एचआयडीईचे ज्ञान भागीदार असल्याचा आम्हाला मोठा अभिमान आहे. यामुळे जबाबदारी देखील वाढली आहे. इन्स्टिट्यूट म्हणून जेडी स्कूल ऑफ डिझाईनने दर्जेदार शिक्षणासाठी प्रत्येकवेळी नाविन्यपूर्ण पावले उचलली आहेत.
आपल्या तज्ज्ञांच्या चमूसह डिझाईन स्कूलने सखोल शिक्षणासाठी अभ्यासक्रमाची रचना केली आहे. एचआयडीई या व्यासपीठामुळे इच्छुकांना आमच्याशी जोडण्यास मदत करताना आमच्या डिझाईनच्या सौंदर्यशास्त्राचा अनुभव घेता येणार आहे. आमच्या आदरणीय इन्स्टिट्यूटचे नाव पॅनेल चर्चेत देखील आहे. त्यामुळे उद्योगातील टिकावूपणा व रितींची सखोल माहिती मिळणार आहे. सध्याच्या काळाची ही गरज आहे. आमच्या एचआयडीई सोबतच्या भागीदारीसह आम्हाला डिझाईन इच्छुकांना आमच्याकडे असलेले ज्ञान देण्याची संधी प्राप्त करते. आम्ही स्थापित केलेल्या संयुक्त विद्यमाने तसेच साहाय्याने इच्छुकांना अधिकाधिक देण्याचा आमचा प्रयत्न असतो, असे जेडी एज्युकेशनल ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्वस्त नीलेश दलाल म्हणाले.
जेडी स्कूल ऑफ डिझाईन बद्दल
जेडी स्कूल ऑफ डिझाईनचे उद्दिष्ट हे जागतिक दर्जाचे शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे आहे. डिझाईन, मीडिया आणि कला क्षेत्रात विविध सर्जनशील सहयोगामध्ये संस्था कार्य करत आहे. विद्यार्थी मेंटर कार्यक्रम, शोध, क्रिएटिव्ह कार्यक्रम, प्रकल्पाभिमूख शिक्षण, स्टेट ऑफ आर्ट तंत्रज्ञान संस्थेकडे असून बंगळुरू सिटी युनिव्हर्सिटी व गोवा विद्यापीठाशी संलग्नता आहे.
जेडी इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नोलॉजी व जेडी स्कूल ऑफ डिझाईन यांचे सहयोगी व संस्थांशी संबंध आहेत. या विविध सहयोगींची व संस्थांची नावे खालीलप्रमाणे
क्युमुलस
इक्यूएसी
इंडो फ्रेंच चेबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री
ईयू इंडिया चेंबर्स
लंडन कॉलेज ऑफ फॅशन, यूके
चेल्सी कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाईन, यूके
इंडिया फॅशन वीक, लंडन
केओईएफआयए
जेबर टेक्नोलॉजी
आयआयआयडी
एडोब इंडिया
मेदिनी ऑटोडेस्क