पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून इंडिया मोबाईल काँग्रेस मध्ये 5G सेवेचे अनावरण. पंतप्रधानांनी जिओ ग्लास द्वारे घेतला व्हर्चुअल रिऍलिटी अनुभव *

.

* पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून इंडिया मोबाईल काँग्रेस मध्ये 5G सेवेचे अनावरण.
पंतप्रधानांनी जिओ ग्लास द्वारे घेतला व्हर्चुअल रिऍलिटी अनुभव *

• सेवा आणि उपकरणे परवडणाऱ्या दरात उपलब्ध असावीत – आकाश अंबानी

नवी दिल्ली, 1 ऑक्टोबर, 2022: इंडिया मोबाइल काँग्रेस (IMC) मध्ये 5G ची सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील प्रगती मैदानावर बटण दाबून 5G सेवा सुरू केली. जिओ ट्रू 5G तंत्रज्ञानाचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान जिओ पॅव्हेलियनला भेट दिली. पंतप्रधानांनी जिओ-ग्लास घालून आभासी वास्तवाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. यादरम्यान जिओचे चेअरमन आकाश अंबानी पंतप्रधानांना जिओ-ग्लासबद्दल सांगताना दिसले. तत्पूर्वी, रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी जिओ पॅव्हेलियनमध्ये पंतप्रधानांचे स्वागत केले.

देशातील जनतेचे अभिनंदन करताना पंतप्रधान म्हणाले की, 130 कोटी भारतीयांना 5G च्या रूपाने दूरसंचार उद्योगाकडून एक अद्भुत भेट मिळाली आहे. 5G ही देशाच्या दारात नव्या युगाची दार ठोठावत आहे. 5G ही संधींच्या अनंत आकाशाची सुरुवात आहे.

पंतप्रधानांनी विरोधकांवरही हल्लाबोल केला. ते म्हणाले की, “आमच्या सरकारच्या प्रयत्नांमुळे भारतात डेटाची किंमत खूपच कमी राहिली आहे. त्याबाबत आपण गडबड केली नाही, मोठमोठ्या जाहिराती दिल्या नाहीत ही वेगळी गोष्ट आहे. देशातील लोकांच्या सुविधा कशा वाढवता येतील, ‘सुगमता’ कशी वाढवता येईल यावर आम्ही लक्ष केंद्रित केले.

उद्घाटन सत्रात मुकेश अंबानी यांनी आश्वासन दिले की लवकरच देश 5G च्या सुपरफास्ट इंटरनेट सेवेचा आनंद घेऊ शकेल. दिवाळीपर्यंत निवडक मेट्रो शहरांमध्ये आणि 2023 च्या अखेरीस देशभरातील प्रत्येक शहर आणि प्रत्येक तालुक्यात 5G सेवा सुरू होईल.

मुकेश अंबानी यांनी संकेत दिले की भारतामध्ये 5G सेवा जगाच्या तुलनेत स्वस्त असेल. ते म्हणाले की “5G ची सेवा भारताच्या दूरसंचार इतिहासातील सामान्य घटना नाही. देशाने थोडी उशीरा सुरुवात केली असेल, परंतु आम्ही जगापेक्षा उच्च दर्जाची आणि अधिक परवडणारी 5G सेवा आणणार आहोत.”

रिलायन्स जिओचे अध्यक्ष आकाश अंबानी यांनी इंडिया मोबाइल काँग्रेसमध्ये पत्रकारांना सांगितले की, डिव्हाइस आणि सेवा दोन्ही प्रत्येक भारतीयाला परवडणारे असले पाहिजेत.

अंबानी यांनी 5G चे वर्णन डिजिटल कामधेनू असे केले. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली 5G साठी उचललेल्या पावलांचेही त्यांनी कौतुक केले आणि 5G हे पुढच्या पिढीतील कनेक्टिव्हिटी तंत्रज्ञानापेक्षा अधिक असल्याचे सांगितले. हे एक मूलभूत तंत्रज्ञान आहे जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज, रोबोटिक्स, ब्लॉकचेन आणि मेटाव्हर्स सारख्या इतर तंत्रज्ञानाची पूर्ण क्षमता पूर्णपणे अनलॉक करेल.

भारती एअरटेलचे सुनील भारती मित्तल यांनी पंतप्रधानांसमोर एक अतिशय मनोरंजक मुद्दा मांडला. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​चेअरमन मुकेश अंबानी यांनी हे तंत्रज्ञान अतिशय वेगाने पुढे नेले आणि आम्हाला म्हणजेच बाकीच्या टेलिकॉम ऑपरेटर्सना त्यांचा वेग वाढवावा लागला हे त्यांनी मान्य केले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar