*जिला ‘नाही’ ऐकू येत नाही- अशा इश्मित ला भेटा- केएफसीची नवी फिल्म ‘Kshamata’ मध्ये*
राष्ट्रीय २३ सप्टेंबर २०२२- तिच्या संपूर्ण आयुष्यात कोणीना कोणीतरी इश्मितचा हात धरुन तीला मार्ग दाखवून तिचे संरक्षण केले आहे. तिने आयुष्यात कधीही ‘नाही’ ऐकलेले नाही. मग काय होते? आता इश्मितचा प्रवास पहा केएफसीच्या नवीन ‘क्षमता’या फिल्म मध्ये. प्रतिथयश फिल्म मेकर शुजित सरकार दिग्दर्शित या फिल्म ची लाँच इंटरनॅशनल डे ऑफ साईन लँग्वेजेस च्या निमित्ताने पीव्हीआर चाणक्यपुरी, नवी दिल्ली येथे केएफसी इंडिया चे जनरल मोक्ष चोप्रा यांच्या हस्ते करण्यात आली. हृदय पिळवटून टाकणारी अशी ही फिल्म असून यामध्ये आपल्यासमोर इश्मित हे पात्र अश्मीत कौर आणि सपना सोनी यांनी साकारले आहे.
हे पात्र आपल्याला समाजाची तिने काय करावे आणि काय करु नये याची शकले मोडून काढतांना दाखवण्यात आले आहे. या स्क्रीनिंग नंतर आयोजित चर्चासत्रा मध्ये मोक्ष, सुजित, ऑगिल्व्ही च्या चीफ क्रिएटिव्ह ऑफिसर रितु शारदा आणि कॅप्सटोन पीपल कन्सल्टिंग च्या संस्थापक आणि सीईओ तसेच विमेन लिडरशिप फोरम ऑफ एशिया च्या संस्थापिका डॉ. सुजया बॅनर्जी अशा मान्यवरांची भाषणे झाली. यावेळी त्यांनी स्पीच ॲन्ड हिअरिंग इम्पेअर्ड (एसएचआय) मधील क्षमता वाढवण्यासाठी आवश्यक विषयांवर चर्चा केली. लोकांना #SpeakSign चा वापर करण्याची विनंती करतांना यावेळी उपस्थित सदस्यांना केएफसीच्या दिव्यांग टिम मेंबर इंद्रजित ने बेसिक साईन लँग्वेजेस ची माहिती दिली.