पर्वरी येथील श्री वेताळ महारुद्र संस्थानात ‘शारदोत्सव

.

पर्वरी येथील श्री वेताळ महारुद्र संस्थानात ‘शारदोत्सव २०२२’
पाच दिवस विविध कार्यक्रम; अभंग गायन, घुमट आरती स्पर्धांचेही आयोजन
पर्वरी :
पर्वरी येथील श्री वेताळ महारुद्र संस्थानात ‘शारदोत्सव २०२२’ बुधवार ५ ते रविवार ९ ऑक्टोबर पर्यंत साजरा करण्यात येणार आहे.
पोर्तुगीज काळापासून याठिकाणी ग्रामस्थांतर्फे सार्वजनिक शारदोत्सव साजरा करण्यात येतो. यानिमित्त बुधवार ५ रोजी आराडी व वीसकलमी वाड्यातर्फे विविध कार्यक्रम होतील. सकाळी ८.३० वा. यजमान सौ. शर्वरी शैलेश जल्मी यांच्याकडून शारदा पूजन, त्यानंतर आरती व तीर्थप्रसाद, संध्या. ६ वा. भजनाचा कार्यक्रम, आरती व तीर्थप्रसाद होईल.
गुरुवार ६ ऑक्टोबर रोजी लिमावाडा, कामतनगर, वर्षाकॉलनी वाड्यातर्फे कार्यक्रम होतील. संध्याकाळी ६ वा. श्री वेताळ कला महिला सांस्कृतिक भजनी मंडळ, लिमावाडा यांच्यातर्फे भजनाचा कार्यक्रम, त्यानंतर आरती व तीर्थप्रसाद होईल.
शुक्रवार ७ ऑक्टोबर रोजी सातिंगण नगर वाड्यातर्फे विविध कार्यक्रम होतील. संध्या. ६ वा. भजनाचा कार्यक्रम, त्यानंतर आरती व तीर्थप्रसाद होईल.
शनिवार ८ ऑक्टोबर रोजी बाजार व कासकर वाड्यातर्फे
कार्यक्रम साजरा करण्यात येईल.
संध्या. ४.३० वा. ओम आर्ट डेकोरेटर पर्वरी आयोजित दुसरी
श्री वेताळ महारूद्र संस्थान मर्यादित महिला अभंग गायन स्पर्धा होणार आहे. अधिक माहितीसाठी शैलेश शेटगांवकर (९८२३३२१९७८) यांच्याशी संपर्क साधावा. त्यानंतर आरती व तीर्थप्रसाद होईल.
रविवार ९ ऑक्टोबर रोजी भुतकी वाड्यातर्फे कार्यक्रम साजरा करण्यात येईल. सकाळी १० वाजता ते दुपारी १.३० वाजेपर्यंत श्री वेताळ महारूद्र देवस्थान मर्यादित घुमट आरती स्पर्धा होईल. संध्याकाळी ३ वा. कै. प्रभाकर रामा सातार्डेकर स्मृती आयोजित अखिल गोवा घुमट आरती स्पर्धा, त्यानंतर आरती व तीर्थप्रसाद होईल. स्पर्धा संयोजक धिरज प्रभाकर सातार्डेकर यांच्याशी अधिक माहितीसाठी संपर्क साधावा. सर्व भाविकांसाठी महाप्रसाद आयोजकांतर्फे दिला जाईल. तद्नंतर सरस्वती मूर्ती विर्सजनाचा कार्यक्रम होईल. सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन श्री वेताळ प्रासादिक ट्रस्ट पर्वरी यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar