थिवी वाताहार
सम्राट क्लब ऑफ म्हापसा चा अधिकार ग्रहण सोहळा म्हापसा येथील बोडगेस्वर सभागृहात पार पडला. ![](http://aizgoanews.com/wp-content/uploads/2022/10/IMG-20221003-WA0082-300x200.jpg)
![](http://aizgoanews.com/wp-content/uploads/2022/10/IMG-20221003-WA0082-300x200.jpg)
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सुबोध केरकर उपस्थित होते. शपथ ग्रहण अधिकारी म्हणून माजी गोवा राज्य अध्यक्ष संदीप निगळे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी नुतन अध्यक्ष म्हापसा म्हणून चंद्रकांत आमोणकर व त्यांच्या संचालक मंडळाला शपथ ग्रहण अधिकारी संदिप निगळे यांनी शपथ दिली. संचालक मंडळावर सचिव म्हणून सुब्राय चोडणकर तर खजिनदार म्हणून रितेश कारेकर याची निवड झाली. संचालक मंडळ सदस्य – शहाजहान खान, गोविंद राज देसाई, अमीन खान , चैतन्य रायकर, रामा रिवणकर यांनाही श्री. निगळे यांनी शपथ दिली.
यावेळी व्यासपीठावर माजी अध्यक्ष प्रकाश ताम्हणकर , माजी सचिव अभय हजारे माजी खजिनदार अमीन खान आदी उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे डॉ. सुबोध केरकर यांनी यावेळी महात्मा गांधी यांचे विचार अंगी बाणवावे असे सांगताना आपली कला व संस्कृती जतन करावी असे आवाहन केले.
अभय हजारे यांनी मागील वर्षी चा अहवाल सादर केला. विनोद मळीक व गोविंदराज देसाई यांनी उपस्थित चा परीचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदिप वालावलकर यांनी केले तर सुब्राय चोडणकर यांनी आभार मानले. .