सम्राट क्लब ऑफ म्हापसा चा अधिकार ग्रहण सोहळा म्हापसा येथील बोडगेस्वर सभागृहात पार पडला.  

.
थिवी वाताहार

सम्राट क्लब ऑफ म्हापसा चा अधिकार ग्रहण सोहळा म्हापसा येथील बोडगेस्वर सभागृहात पार पडला. 
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सुबोध केरकर उपस्थित होते. शपथ ग्रहण अधिकारी म्हणून माजी गोवा राज्य अध्यक्ष संदीप निगळे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी नुतन अध्यक्ष म्हापसा म्हणून चंद्रकांत आमोणकर व  त्यांच्या संचालक मंडळाला शपथ ग्रहण अधिकारी संदिप निगळे यांनी शपथ दिली. संचालक मंडळावर सचिव म्हणून सुब्राय चोडणकर तर खजिनदार म्हणून रितेश कारेकर याची निवड झाली. संचालक मंडळ सदस्य – शहाजहान खान, गोविंद राज देसाई, अमीन खान , चैतन्य रायकर, रामा रिवणकर यांनाही  श्री. निगळे यांनी शपथ दिली.
यावेळी व्यासपीठावर माजी अध्यक्ष प्रकाश    ताम्हणकर , माजी सचिव अभय हजारे   माजी खजिनदार  अमीन खान आदी उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे डॉ. सुबोध केरकर यांनी यावेळी महात्मा गांधी यांचे विचार अंगी बाणवावे असे सांगताना आपली कला व संस्कृती जतन करावी असे आवाहन केले.
अभय हजारे यांनी मागील वर्षी चा अहवाल सादर केला. विनोद मळीक व गोविंदराज देसाई यांनी उपस्थित चा परीचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदिप वालावलकर यांनी केले तर सुब्राय चोडणकर यांनी आभार मानले. .

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar