प्रथमोपचार शिकणे ही काळाची गरज! – श्री. अंकुश परब*

.

 

*प्रथमोपचार शिकणे ही काळाची गरज! – श्री. अंकुश परब*

बुधवार, दि. ५ ऑक्टोबर (वार्ता.) – आजच्या या धकाधकीच्या जीवनात कोणावर कोणती वेळ कधी येईल हे सांगता येत नाही. एखाद्या अपघात ग्रस्थाला तात्काळ प्रथमोपचार मिळाल्यास जीवित हानी टाळली जाऊ शकते, यास्तव प्रत्येकाने प्रत्येकाने प्रथमोपचार प्रशिक्षण घेणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन श्री. अंकुश परब यांनी केले.

ते हिंदु जनजागृती समितीच्या द्विशतक पूर्तता अभियानांतर्गत प्रथमोपचाराची आवश्यकता याविषयावर मार्गदर्शन करतांना बोलत होते. सदर कार्यक्रम कायसुवचा राजा गणेशोत्सव मंडळ, देऊळवाडा, हणजुण येथे दुर्गामाता पूजनाचे औचित्य साधून आयोजित केला होता. श्री. परब यांनी यावेळी लहान मुलांच्या घशात गोटी अडकल्यास ती प्रथमोपचार देतांना कशी अलगत काढावी हा भाग प्रात्यक्षिक दाखवून करून दाखवला. त्याचप्रमाणे प्रोजेक्टरचा वापर करून स्पष्ट केला. यावेळी सौ. पिंगल लोटलीकर यांनी हृदय विकाराबाबत उपस्थितांना सुयोग्य माहिती दिली. यात हृदय विकाराची प्राथमिक लक्षणे काय, ती आढळल्यास काय दक्षता घायला हवी याबाबत सोदाहरण स्पष्ट केले.

यावेळी हर घर अभियान याविषयी सांगण्यात आले व दसऱ्यापर्यंत प्रत्येक हिंदूने आपल्या घरी भगवा फडकावा असे आवाहन करण्यात आले. तसेच हिंदुराष्ट्र प्रतिज्ञा घेण्यात आली. उपस्थित बांधवांनी यास उत्फुर्त प्रतिसाद दिला. यावेळी श्री. श्रीयश पिसोळकर व राजेश कोरगावकर यांनीही हिंदूराष्ट्राविषयी सूत्रे मांडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. युवराज गावकर यांनी तर आभार श्री. राजेश कोरगावकर यांनी मानले.

*क्षणचित्रे :*
१. या कार्यक्रमाला अंजुना-कायसुवा ग्राम पंचायतीच्या माजी सरपंच्या सौ. नली गोवेकर यांनी उपस्थिती लावली.

२. कायसुवचा राजा गणेशोत्सव मंडळ, देऊळवाडा, हणजुण या मंडळाचे अध्यक्ष श्री. राजेश मांद्रेकर यांनी हा कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले. याठिकाणी लोकांची उपस्थिती लाभावी यासाठी प्रयत्न केले.
३. आपल्या गावात प्रथमोपचार वर्ग सुरू करण्यात यावी, अशी मागणी केली.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें