अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाजातफै बादैश तालुक्यातील दहावी व बारावी परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव सोहळा विवेकानंद सभागृह पर्वरी येथे पार पडला

.
अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाजातफै बादैश तालुक्यातील दहावी व बारावी परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव सोहळा विवेकानंद सभागृह पर्वरी येथे पार पडला.
या   कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक डॉ. संजय सावंत देसाई तर अध्यक्ष स्थानी अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाजाचे अध्यक्ष महेश गावकर, उपस्थित होते
 यावेळी बादैश तालुका प्रमुख जगन्नाथ देसाई, उत्तर गोवा महिला अध्यक्षा विद्या परब, दक्षिण गोवा महिला अध्यक्षा प्रफुल्ल सावंत देसाई, पंच राजाराम शेटगावकर, अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाजाचे उपाध्यक्ष ॲड. अर्जुन शेटगावकर, बाबूराव देसाई, महादेव देसाई, प्राचार्य विठ्ठल पासैकर, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शेजल पासैकर हिने पुष्पांजली व स्वरा देसाई हिने गणेश वंदना सादर केली. प्रमोद शेटगावकर व किशोर सावंत यांनी विद्यार्थ्यांचा नावे वाचुन दाखवली. महेश गावकर यांनी समाज बांधवांसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन केले. प्रमुख पाहुणे डॉ. संजय देसाई यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले व भावी आयुष्यात सुयश चिंतले. विद्यार्थ्यांनी सामान्य ज्ञान वाढवावे व त्यासाठी वाचन करावे असा सल्ला दिला
यावेळी उपस्थित मान्यवर च्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना चषक व प्रमाणपत्र देऊन त्यांना गौरवण्यात आले. प्राचार्य विठ्ठल पासैकर यांनी परीचय करून दिला. जे. के. देसाई यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिया वसकर यांनी केले तर प्राचार्य विठ्ठल पासैकर यांनी आभार मानले
फोटो गुणवंत विद्यार्थ्यांच्या समवेत महेश गावकर, जगन्नाथ देसाई ॲड. शेटगावकर. डॉ. संजय देसाई.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar