हरमल पंचक्रोशी शिक्षण मंडळात सरस्वतीपूजन विविध कार्यक्रमांनिशी संपन्न
हरमल येथील हरमल पंचक्रोशी शिक्षण मंडळात सरस्वती पूजन दिनांक ०४ ऑक्टोबर २०२२ रोजी विविध कार्यक्रमांनिशी संपन्न झाले. यंदा सरस्वती पूजनाचे यजमानपद उच्च माध्यमिक विद्यालयाला मिळाले होते. उत्सव समितीतर्फे विद्यार्थ्यी व कर्मचारी वर्गासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सर्वप्रथम सकाळच्या सत्रात स्टुडंट कौन्सिलचे जनरल सेक्रेटरी कु. सोहम नारायण रेडकर याच्या यजमानपदाखाली सरस्वती मातेची विधीवत पूजा करण्यात आली. या वेळी संस्थेचे अध्यक्ष श्री लक्ष्मीकांत पार्सेकर, मुख्याध्यापिका सौ. स्मिता पार्सेकर, प्राचार्य श्री उद्देश नाटेकर, प्राचार्य श्री. गोविंदराव देसाई, समस्त शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थीवर्ग मोठ्या संखेने उपस्थित होते. त्यानंतर हायस्कूल व शिक्षण महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केले.
महाप्रसादानंतर दुपारच्या सत्रात उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी व कर्मचारीवर्गातर्फे सुगम संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी भजन, भावगीत, नाट्यगीताच्या माध्यमातून विद्यार्थी व शिक्षक वर्गाने सरस्वतीमातेच्या चरणी आपली सेवा अर्पण केली. त्यांना संगीत शिक्षक श्री. दशरथ नाईक, श्री. राजीव गावकर व श्री. यांचे मार्गदर्शन व साथसंगत लाभली. शेवटी उत्तरपूजेच्यावेळी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या घुमट आरतीने सरस्वती पूजनाची उत्सव सांगता झाली.
हा उत्सव साजरा करण्यासाठी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी वर्गाने विशेष परिश्रम घेतले. शिक्षक श्री सनिल पार्सेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी साकारलेली इको-फ्रेंडली सजावट उत्सवाचे विशेष आकर्षण ठरणारी होती