दसऱ्याच्या मुहूर्तावर ई-टेक स्कील अकादमीच्या संकेतस्थळाचे अनावरण

.

फोटो ओळ : ई-टेक स्कील अकादमीच्या या संकेतस्थळाचे अनावरण करताना उद्योजक नितीन कुंकळेकर. सोबत सस्थापक परवीश कामत, अबीर कामत व इतर मान्यवर.

 

दसऱ्याच्या मुहूर्तावर ई-टेक स्कील अकादमीच्या संकेतस्थळाचे अनावरण
पणजी, दि. ६ परवीश अंदानी कामत यांच्या ई-टेक स्कील अकादमीच्या संकेतस्थळाचे अनावरण काल (दि. ५) पार पडले. गोव्यातील उद्योजक नितीन कुंकळेकर यांनी मिरामार येथे झालेल्या एका छोट्या समारंभात ई-टेक स्कीलच्या www.etesacademy या संकेतस्थळाचे अनावरण केले. नितीन कुंकळेकर हे सिनर्जा ईएमएस लि.चे संचालक व बोर्ड सदस्य आहेत तसेच ते एमएआयटीचे प्रेसिडेंट इमेरेटस आहेत. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ई-टेक स्कील अकादमीच्या संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले.
अनावरणानंतर परविश कामत यांचे या नव्या उपक्रमाबद्दल अभिनंदन करताना नितीन कुंकळेकर म्हणाले की, आज जागतिक स्तरावर अनेक व्यवसायांमध्ये ई-टेक कुशलता गरजेची झाली आहे. आज भारतात ५-जी सेवा चालू झाली आहे आणि यासोबत अनेक संलग्न उत्पादने, नवनवीन अप्स येतील त्यामुळे ती हाताळण्याची कला व कुशलता नव्या पिढीसाठी आवश्यक ठरणार आहे. गोव्याला आज कौशल्याची गरज आहे, परविशने ही वेबसाइट सुरू करण्यासाठी आणि 5G उत्पादनासह समाजातील दुर्बल घटकांसाठी डिजिटल कौशल्यांमध्ये जाण्यासाठी एक अतिशय महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. यापुढील काळात समाजात व नोकरी व्यवसयात असा एक वर्ग असेल की ज्याला डिजीटली शिक्षित व प्रशिक्षित असणे, ही अत्यंत महत्वाची गरज राहणार आहे. भारत सरकारची बहुतेक मंत्रालये आणि देशाला नवे आयाम देणारे आपले पंतप्रधान यावर भर देत आहेत. गोव्यात अशा प्रकारची प्रशिक्षण अकादमी स्थापन केल्याबद्दल मी व्यक्तीशः परवीश कामत यांचे आभार मानतो व त्यांना शुभेच्छा देत आहे.
ई-टेक स्कील अकादमीच्या संस्थापक परवीश कामत म्हणाल्या की, आमची अकादमी राज्यातील महाविद्यालयांमध्ये ई-टेक प्रशिक्षणांसाठी लहान, मध्यम कालावधीचे विविध अभ्यासक्रम घेणार असून काही महाविद्यालयात आमचे काम चालू झाले आहे. त्याशिवाय गोव्यातील उद्योजक, व्यावसायिकांना हे प्रशिक्षण उपलब्ध करून दिले जाणार आहे. समाजातील प्रत्येक घटकांसाठी हे प्रशिक्षण असल्याने इंग्रजी, हिंदी व कोकणी भाषेत आम्ही अभ्यासक्रम तयार करण्याचे काम चालू केले आहे.
ई-टेक स्कील अकादमीमध्ये घेतल्या जाणाऱ्या प्रशिक्षणे वा मोड्यूल्समध्ये ४० व त्यावरील प्रौढांसाठी टेक, लिंक्डइन – तुमचे कंपनी पेज तयार करा, डिजिटल मार्केटिंग 4. कॅनव्हा – 4 दिवसांचा मास्टरक्लास, सामग्री लेखन (कंटेंट रायटिंग) आणि कौशल्य विकास, स्टॉक मार्केट, ईमेल मार्केटिंग 5 दिवसांचा मास्टरक्लास, गोव्यातील विद्यार्थी/महाविद्यालयांसाठी दुबई आणि सिंगापूरचे शैक्षणिक अभ्यास दाैरे यांचा समावेश आहे. आजपर्यंत ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी या मोड्यूल्सचा लाभ घेतला आहे. त्याशिवाय एक दिवसीय कार्यशाळांचे नियोजन केले आहे. आमच्या या मोड्यूल्सचा लाभ घेण्यासाठी आमच्या
www.etesacademy.in या वेबसाइटला भेट द्या किंवा 9823284750 / +91 87888 08066 वर संपर्क करावा. परवीश कामत गेली २० हून अधिक वर्षे जाहिरात, विपणन, पीआर व मीडिया व्यवस्थापन या क्षेत्रात धडाडीने काम करीत आहेत. त्यासाठी त्यांना अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार तसेच शिष्यवृत्ती मिळाल्या आहेत.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar