Tvs मोटर कंपनीकडून गोव्‍यामध्‍ये अनेक उत्‍साहवर्धक वैशिष्‍ट्यांनी युक्‍त नवीन टीव्‍हीएस आयक्‍यूब इलेक्ट्रिक स्‍कूटर्स लाँच

.

Tvs मोटर कंपनीकडून गोव्‍यामध्‍ये अनेक उत्‍साहवर्धक वैशिष्‍ट्यांनी युक्‍त नवीन टीव्‍हीएस आयक्‍यूब इलेक्ट्रिक स्‍कूटर्स लाँच
नवीन टीव्‍हीएस आयक्‍यूब सिरीजमध्‍ये अनेक दर्जात्‍मक कनेक्‍टेड वैशिष्‍ट्ये आहेत, जसे वैयक्तिकृत थीम्‍स, म्‍युझिक प्‍लेअर कंट्रोल, वॉईस असिस्‍ट व टीव्‍हीएस आयक्‍यूब अॅलेक्सा स्किलसेट, वेईकल हेल्‍थ आणि सुरक्षितता व ओटीए अपडेट्स
टीव्‍हीएस आयक्‍यूब आणि टीव्‍हीएस आयक्‍यूब एस मध्‍ये १०० किमीची सुधारित ऑन-रोड रेंज आहे, तर टीव्‍हीएस आयक्‍यूब एसटी एका चार्जमध्‍ये १४० किमीची दर्जात्‍मक ऑन-रोड रेंज देईल
पणजी, ऑक्‍टोबर ७, २०२२: टीव्‍हीएस मोटर कंपनीने आज गोव्‍यामध्‍ये शहरातून उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाल्‍यानंतर दर्जात्‍मक ऑन-रोड रेंज देणाऱ्या नवीन टीव्‍हीएस आयक्‍यूब इलेक्ट्रिक स्‍कूटर सिरीजचे अनावरण केले. या स्‍कूटर्समध्‍ये अनेक इंटेलिजण्‍ट कनेक्‍टेड वैशिष्‍ट्ये आहेत, जसे ७ इंच टीएफटी टचस्क्रिन व क्‍लीन यूआय, अनेक थीम वैयक्तिकरण, वॉईस असिस्‍ट व टीव्‍हीएस आयक्‍यूब अॅलेक्‍सा स्किलसेट, सर्वोत्तम म्‍युझिक प्‍लेअर कंट्रोल, ओटीए अपडेट्स, चार्जरसोबत प्‍लग-अॅण्‍ड-प्‍ले कॅरी चार्जिंग, वेईकल हेल्‍थ व सेफ्टी नोटिफिकेशन्‍स, अनेक ब्‍ल्‍यूटूथ व क्‍लाऊड कनेक्‍टीव्‍हीटी पर्याय, ३२ लिटर स्‍टोरेज स्‍पेस आणि इतर अनेक.
प्रबळ व विश्‍वसनीय टीव्‍हीएस मोटरच्‍या अभियांत्रिकी क्षमतांच्‍या पाठबळासह टीव्‍हीएस आयक्‍यूबची प्रबळ चाचणी करण्‍यात आली आहे, ज्‍याला उत्तमरित्‍या स्‍थापित नेटवर्क सपोर्ट, रिलेशनशिप मॅनेजर व सर्वांगीण डिजिटल परिसंस्‍थेचे पाठबळ आहे.
टीव्‍हीएस मोटर कंपनीच्‍या फ्यूचर मोबिलिटीचे वरिष्‍ठ उपाध्‍यक्ष श्री. मनू सक्‍सेना म्‍हणाले, ‘’विद्यमान नवीन टीव्‍हीएस आयक्‍यूब सिरीज ग्राहकांच्‍या मोठ्या समूहाला अधिक निवडी देते. नवीन टीव्‍हीएस आयक्‍यूब सिरीजमध्‍ये उच्‍च रेंज, तसेच अनेक चार्जिंग पर्याय आणि दर्जात्‍मक डिस्‍प्‍ले व यूआय पर्याय आहेत. याव्‍यतिरिक्‍त या सिरीजमध्‍ये आधुनिक कनेक्‍टेड वैशिष्‍ट्ये, अॅप्‍लीकेशन्‍स व कनेक्‍टेड ऑन-डिवाईस अनुभव समाविष्‍ट आहे. आम्‍ही टीव्‍हीएस मोटरची दर्जाबाबत कटिबद्धता अधिक दृढ करण्‍यासाठी आमच्‍या व्यापक आरअॅण्‍डडी व सत्‍यापन प्रक्रियेच्‍या माध्‍यमातून नवीन टीव्‍हीएस आयक्‍यूब विकसित केली आहे. आमचा दृढ विश्‍वास आहे की, आमचे व्‍यापक नेटवर्क व परिसंस्‍थेसह आम्‍ही ग्राहकांना उच्‍च दर्जाचे समाधान व हमी देऊ.’’
टीव्‍हीएस आयक्‍यूब सिरीज ११ रंग व ३ चार्जिंग पर्यायांमधील ३ व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये येते.
टीव्‍हीएस आयक्‍यूब एस
टीव्‍हीएस आयक्‍यूब एस व्‍हेरिएण्‍टमध्‍ये टीव्‍हीएस मोटरने डिझाइन केलेली ३.४ केडब्‍ल्‍यूएच बॅटरी आहे आणि ही स्‍कूटर प्रतिचार्ज व्‍यावहारिक १०० किमी ऑन-रोड रेंज देते.
टीव्‍हीएस आयक्‍यूब एस मध्‍ये ७ इंच टीएफटीसह परस्‍परसंवादासाठी सर्वोत्तम ५-वे जॉयस्टिक, म्‍युझिक कंट्रोल, थीम वैयक्तिकरण, सक्रिय नोटिफिकेशन्‍ससह वेईकल हेल्‍थ अशी सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये आहेत.
टीव्‍हीएस आयक्‍यूब एस चार नवीन रंगांच्‍या व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये उपलब्‍ध आहे.
टीव्‍हीएस आयक्‍यूब
टीव्‍हीएस आयक्‍यूब बेस व्‍हर्जनमध्‍ये टीव्‍हीएस मोटरने डिझाइन केलेली ३.४ केडब्‍ल्‍यूएच बॅटरी आहे आणि ही स्‍कूटर प्रतिचार्ज व्‍यावहारिक १०० किमी ऑन-रोड रेंज देते. या वेईकलमध्‍ये ५ इंच टीएफटीसह टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन असिस्‍ट आहे.
टीव्‍हीएस आयक्‍यूब बेस व्‍हेरिएण्‍ट तीन रंगांमध्‍ये उपलब्‍ध आहे.
टीव्‍हीएस आयक्‍यूब एसटी
टॉप-ऑफ-द-लाइन व्‍हेरिएण्‍ट टीव्‍हीएस आयक्‍यूएब एसटी मध्‍ये टीव्‍हीएस मोटरने डिझाइन केलेल्‍या ५.१ केडब्‍ल्‍यूएच बॅटरी पॅकची शक्‍ती आहे आणि ही स्‍कूटर प्रतिचार्ज दर्जात्‍मक १४० किमी ऑन-रोड रेंज देते.
टीव्‍हीएस आयक्‍यूएब एसटी मध्‍ये अभूतपूर्व इंटेलिजण्‍ट राइड कनेक्‍टीव्‍हीटीसह ७ इंच टीएफटी टचस्क्रिन, ५-वे जॉयस्टिक इंटरअॅक्टिव्‍हीटी, म्‍युझिक कंट्रोल, सक्रिय नोटिफिकेशन्‍ससह वेईकल हेल्‍थ, ४जी टेलिमॅटिक्‍स व ओटीए अपडेट्स अशी सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये आहेत. या स्‍कूटरमध्‍ये अनेक थीम वैयक्तिकरण, वॉईस असिस्‍ट व टीव्‍हीएस आयक्‍यूब अॅलेक्‍सा स्किलसेट आहे.
टीव्‍हीएस आयक्‍यूएब एसटी चार नवीन अल्‍ट्रा-प्रिमिअम रंगांच्‍या पर्यायांमध्‍ये उपलब्‍ध आहे आणि १.५ केडब्‍ल्‍यू फास्‍ट चार्जिंग व ३२ लिटरच्‍या सीट स्‍टोरेजखाली व्‍यापक टू-हेलमेटसह येते.
टीव्‍हीएस स्‍मार्टएक्‍सकनेक्‍टTM व्‍यासपीठ सुधारित नेव्हिगेशन सिस्टिम, टेलिमॅटिक्‍स युनिट, अॅण्‍टी-थेफ्ट व जिओफेन्सिंग वैशिष्‍ट्यांसह सुधारित करण्‍यात आले आहे. टीव्‍हीएस आयक्‍यूब अॅलॅक्‍सा स्किलसेटच्‍या माध्‍यमातून ग्राहक वॉईस कमांड्स देत महत्त्वाची माहिती मिळवू शकतात.
प्‍लग-अॅण्‍ड-प्‍ले कॅरीसह ९५० वॅट व ६५० वॅट क्षमतेचे ऑफ-बोर्ड चार्जर्स आणि चार्जिंग वेळ ३ तास व ४.५ तास हे पर्याय अनुक्रमे टीव्‍हीएस आयक्‍यूब एसटी व टीव्‍हीएस आयक्‍यूएब एस मध्‍ये उपलब्‍ध आहेत.
टीव्‍हीएस आयक्‍यूब व टीव्‍हीएस आयक्‍यूब एस साठी बुकिंग्ज आमच्‍या वेबसाइटवर सुरू आहेत. या मॉडेल्‍सच्‍या डिलिव्‍हरी देखील सुरू आहेत. दोन्‍ही स्‍कूटर्स देशातील आम्‍ही कार्यरत असलेल्‍या ८५ शहरांमधील १६५ डिलरशिप्‍समध्‍ये उपलब्‍ध आहेत.
टीव्‍हीएस आयक्‍यूब व टीव्‍हीएस आयक्‍यूब एस अनुक्रमे ११८३७२ रूपये व १२६३१५ रूपये या आकर्षक किंमतींमध्‍ये उपलब्‍ध असतील (ऑन-रोड गोवासह फेम २ व राज्‍य सबसिडी).

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar