आपला परिसर, घर व शाळा स्वच्छ राखणे आपले कर्तव्य आहे. स्वछते करिता विध्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे, आमची बँक समाजातील सर्व क्षेत्रात सीएसआर अंतर्गत मदत करित असते असे प्रतिपादन युनियन बँक ऑफ इंडियाचे गोवा

.
प्रतिनिधी
       आपला परिसर, घर व शाळा स्वच्छ राखणे आपले कर्तव्य आहे. स्वछते करिता विध्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे, आमची बँक समाजातील सर्व क्षेत्रात सीएसआर अंतर्गत मदत करित असते असे प्रतिपादन युनियन बँक ऑफ इंडियाचे गोवा रिजन चे रिजनल हेड अशोक उपाध्याय यांनी केले.
       हणजूण येथील सिक्रेट हार्ट हायस्कुल ला युनियन बँक ऑफ इंडिया, हणजूण शाखेतर्फे व्यवसायिक सामाजिक बांधिलकी (सीएसआर ) अंतर्गत दोन स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्यात आली, या कार्यक्रमाच्या उदघाट्न बँकेचे रिजनल हेड अशोक उपाध्याय यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरव्यवस्थापक श्रीराम आमोणकर, हणजूण शाखा व्यवस्थापक देवर्षू शर्मा, सिक्रेट हार्ट हायस्कुलचे व्यवस्थापक फा. मायकल रिबेलो, मुख्याध्यापक सिल्व्हेस्टर डिसोझा उपस्थित होते.
      सुरवातीला शिक्षिका लीना पार्सेकर यांनी स्वागत केले, आभार फा. मायकल रिबेलो यांनी मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजू मांद्रेकर यांनी केले. यावेळी शाळेच्या विध्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar