आस्कावाडा मांद्रे येथील गांवकर प्लाझामध्ये डिचोली भागातील लक्ष्मी हॉटेल केटरर्स, आईस्क्रीम पार्लरचे उदघाटन डिचोलीचे आमदार तथा गोवा इन्फोटेक महामंडळाचे चेअरमन डॉ चंद्रकांत शेट्ये यांच्याहस्ते दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर करण्यात आले.

.

हरमल वार्ताहर

आस्कावाडा मांद्रे येथील गांवकर प्लाझामध्ये डिचोली भागातील लक्ष्मी हॉटेल केटरर्स, आईस्क्रीम पार्लरचे उदघाटन डिचोलीचे आमदार तथा गोवा इन्फोटेक महामंडळाचे चेअरमन डॉ चंद्रकांत शेट्ये यांच्याहस्ते दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर करण्यात आले.

ह्या आस्थापनाचे मालक महादेव पोपकर व पांडुरंग वाणी यांनी उदघाटक डॉ शेट्ये व निवृत्त पोलिस अधीक्षक उमेश गांवकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.आमदार डॉ शेट्ये यांनी दीपप्रज्वलनाने आस्थापनाचे उदघाटन केले.लक्ष्मी आस्थापनाचे उदघाटन करताना अत्यानंद होत असून मालक पोपकर हे खाण संबंधित व्यवसायात होता,सध्या तो व्यवसाय बंद झाल्याने,त्यांनी  केटरिंग व्यवसायात पूर्णवेळ झोकून देण्याचे ठरविले आहे.त्यानी डीचोळीत केटरिंग व्यवसायात चांगला अनुभव प्राप्त केला असल्याने ह्या नवीन अस्थापणात भरपूर यश मिळो,असे आमदार डॉ शेट्ये यांनी व्यक्त केले. निवृत्त पोलिस अधीक्षक उमेश गांवकर यानी त्यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी  पोपकर यांनी ह्या अस्थापणात रुचकर व लोकांच्या पसंतीनुसार खाद्यपदार्थ तसेच लग्नसराई,वाढदिवस, गृहप्रवेश व अन्य समारंभासाठी आपले आस्थापन कार्यरत असेल व उपलब्ध केले जाईल,असे मालक पोपकर यांनी सांगितले.यावेळी पोपकर,वाणी यांचे नातेवाईक व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो
मांद्रे—आस्कावाडा मांद्रे येथे लक्ष्मी हॉटेल,केटरिंग, आईस्क्रीम पार्लरचे दीपप्रज्वलन करताना डिचोली चे आमदार डॉ चंद्रकांत शेट्ये सोबत उमेश गांवकर, महादेव पोपकर,पांडुरंग वाणी व अन्य.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें