हलाल सक्ती विरोधी परिषदेत ‘हलाल जिहाद ?’ या ग्रंथाचे लोकार्पण !*

.

*

 

 

*हलाल सक्ती विरोधी परिषदेत ‘हलाल जिहाद ?’ या ग्रंथाचे लोकार्पण !*

*12 आणि 13 नोव्हेंबरला मुंबईत होणार्‍या ‘हलाल परिषदे’ला विरोध करण्याचा एकमताने ठराव!*

हलाल प्रमाणपत्र म्हणजे आजच्या काळातील जिझीया करच आहे. आज संपूर्ण जगात हलाल अर्थव्यवस्था पसरली आहे. हलाल मान्यता असलेल्या उत्पादनांचा मुसलमान आग्रह करत आहेत. त्यामुळे हिंदु व्यापारी आणि उद्योजक यांच्यावर हलालची सक्ती केली जात आहे. सरकारचे प्रमाणपत्र असतांनाही अशा प्रकारे हलालची सक्ती करणे म्हणजे हिंदूंचा संविधानिक अधिकार नाकारणे आहे. ‘हलाल’ केवळ मुसलमान करू शकत असल्याने त्यातून एक प्रकारे बहुसंख्य हिंदूंवरच बहिष्कार टाकला जात आहे. त्यामुळे *आता हिंदूंनीच संघटितपणे या ‘हलाल’ अर्थव्यवस्थेला ‘झटका’ द्यावा, असे आवाहन ‘हलाल जिहाद ?’ या ग्रंथाचे संकलक आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले.* ते दादर येथील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका’त आयोजित ‘हलाल सक्ती विरोधी परिषदे’त बोलत होते. *या परिषदेत 12 आणि 13 नोव्हेंबरला मुंबईत होणार्‍या ‘हलाल परिषदे’ला विरोध करण्याचा एकमताने ठराव करण्यात आला.* या वेळी श्री. रमेश शिंदे यांच्याद्वारे संकलित ‘हलाल जिहाद ?’ या ग्रंथाचे लोकार्पण करण्यात आले.

*हलाल रोखण्यासाठी हिंदूंची कृती समिती निर्माण करून हलाल प्रमाणपत्र सक्तीला विरोध करावा !* – रणजित सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक

अकबराच्या काळापासून लव्ह जिहाद चालू आहे. आता हलाल जिहाद चालू झाला आहे. हलाल प्रमाणपत्राच्या माध्यमातून मिळणार्‍या धनातून जिहादी संघटना भारतासह जगावर राज्य करण्याचे षड्यंत्र रचत आहेत. त्यामुळे हलाल प्रमाणपत्र सक्तीवर बहिष्कार घालणे, हे प्रत्येक हिंदूचे कर्तव्य आहे. हिंदूंनी कृष्णनीती अवलंबून हलाल अर्थव्यवस्थेवर आर्थिक बहिष्कार टाकावा. हलाल रोखण्यासाठी हिंदूंची कृती समिती निर्माण करून हलाल प्रमाणपत्र सक्तीला कडाडून विरोध करावा.

*हलाल अर्थव्यवस्थेला विरोध करण्यासाठी ‘मनसे’ सज्ज !* – यशवंत किल्लेदार, उपाध्यक्ष, मनसे

‘हलाल’ हे मुसलमांपर्यंत मर्यादित हवे, त्याची सक्ती हिंदूंवर का ? हलाल प्रमाणपत्र सक्तीमागे जे षड्यंत्र चालू आहे. त्याला आता ‘झटका’ देण्याची वेळ आली आहे. हलाल अर्थव्यवस्थेला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सदैव सिद्ध आहे. आमचे नेते राजसाहेब ठाकरे हे हलाल विरोधात हिंदूंच्या पाठीशी उभे राहतील.

या वेळी *भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि माजी खासदार डॉ. विजय सोनकर शास्त्रीजी* म्हणाले की, हलाल पद्धती ही केवळ मांस कापण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. आज सर्वच क्षेत्रांत हलाल अर्थव्यवस्थेने प्रवेश केला आहे. हलाल जिहाद हे हिंदूंच्या विरोधातील मोठे षड्यंत्र आहे. दिल्लीतील उपहारगृहांनाही मांस ‘झटका’ आहे की ‘हलाल’ आहे, हे ग्राहकांना ठळकपणे दाखवावे, असे तेथील महानगरपालिकेच्या भाजप प्रशासनाने सक्तीचे केले आहे.

वसई (मेधे) येथील *‘परशुराम तपोवन आश्रमा’चे संस्थापक भार्गवश्री बी.पी. सचिनवाला* म्हणाले की, हिंदूंनी आपल्यातील भगवान परशुराम जागवून सनातन धर्माचा प्रचार आणि प्रसार करावा. असे केल्यास सर्व प्रकारचे हलाल जिहादसह सर्व जिहाद आपसूकच नष्ट होतील. तर *अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाचे कार्याध्यक्ष डॉ. विजय जंगम* म्हणाले की, हलालमागे खूप मोठे षड्यंत्र सुरू असून याला रोखण्यासाठी आम्हाला ‘त्रिशूळ’ प्रमाणपत्र देण्यास सरकारने परवानगी द्यावी.
*‘अखिल भारतीय खाटीक समाजा’चे महाराष्ट्र प्रभारी श्री. विवेक घोलप* म्हणाले की, हलालमुळे हिंदू खाटिकांवर बेकारीची कुर्‍हाड कोसळली आहे. हिंदूंनी ‘हलाल’ ऐवजी ‘झटका’ पद्धतीचे मांस घेण्यासाठी आग्रह धरावा, तर *‘झटका महासंघा’चे श्री. संतोषकुमार गुप्ता* यांनी ‘हलाल जिहाद ला विरोध करण्यासाठी हिंदूंनी झटका पद्धतीचेच मांस घ्यावे’, असे आवाहन केले. ‘हिंदूंनी आपली ताकद आणि संघटन वाढवावे, तरच आपण हलालरूपी षड्यंत्र हाणून पाडू शकतो, असे मत *‘महाराष्ट्र राज्य सराफ आणि सुवर्णकार फेडरेशन’चे अध्यक्ष श्री. मोतीलाल जैन* यांनी व्यक्त केले.

या वेळी ज्येष्ठ अभिनेते श्री. शरद पोंक्षे, प्रसिद्ध व्याख्याते आणि पत्रकार श्री. पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ, सुप्रसिद्ध लेखक आणि प्रवचनकार डॉ. सच्चिदानंद शेवडे आदी मान्यवरांनी व्यक्त केलेल्या विषयाचा व्हिडिओ या कार्यक्रमात प्रसारित करण्यात आला, ज्यात हलाल अर्थव्यवस्थेला विरोध करण्याचे त्यांनी आवाहन केले. या ‘हलाल सक्ती विरोधी परिषदे’त ‘हलाल’ अर्थव्यवस्थेला संघटित होऊन ‘झटका’ देण्याचा निर्धार व्यक्त करत विविध ठराव संमत करण्यात आले. संपूर्ण ‘वंदे मातरम्’ने या कार्यक्रमाची सांगता झाली.

आपला नम्र,

*श्री. रमेश शिंदे,*
राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती.
(संपर्क : 99879 66666)

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar