जायंट्स वेल्फेअर फौंडेशनच्या माध्यमातून संस्थेने मानवजातीसाठी सेवा करण्यासाठी कार्यरत असलेल्या समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान करून आदर्श पायंडा घालण्याचे कार्य केल्याबद्दल भाजपचे प्रदेश अध्यक्ष सदानंद तानावडे यांनी अभिनंदन केले आहे.
मिरामार येथील गास्पर डायस फिएसता क्लबच्या सभागृहात कर्तृत्ववान व्यक्तींच्या सन्मान कार्यक्रमात बोलत होते.फेडरेशन 10 ह्या जायंट्स वेल्फेअर फौंडेशन ह्या मूळ भारतीय संस्थेची प्रशंसा केली.जगभरात ह्या क्लबचे कार्य व ओळख वेगळी आहे.जायंट्सना केलेल्या चांगल्या कार्याची माहिती वृत्तपत्र माध्यम, सोशल मीडियावर होणे आवश्यक असल्याचे सांगितले.त्यांनी विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या व्यक्तींचे कौतुक केले आहे.ह्या आदर्श व्यक्तींत पोहणारा,डॉक्टर,शिक्षक,संगीत,हॉ
ह्या सोहळ्याला जायंट्स वेल्फेअर फौंडेशनचे उपजागतिक अध्यक्ष नरुद्दीन सेवावाला उपस्थित होते,त्यांनी जायंट्स 10 ग्रुपच्या कार्याची प्रशंसा केली ज्या अतंर्गत 14- 15 गट समाजातील गरजूंचे प्रकल्प हाती घेण्यासाठी सक्रिय आहेत व केंद्रीय समिती गोव्याच्या ह्या कार्याला नेहमीच पाठिंबा देईल,असे सेवावाला ह्यांनी बोलताना सांगितले.यावेळी जायंट्स 10 चे गोवा अध्यक्ष बसवराज पुजारी,केंद्रीय समिती सदस्य दीपक डिसौझा,श्रीमती वर्षा नाईक उपस्थित होते.सन्मानमूर्तीचा परिचय संजय बाणवलीकर,संजय गांवकर,नाझरेथ वाझ,डॉ नूतन डीचोलकर,उमेश प्रभुगांवकर,विनय धुरी यांनी केला.प्रारंभी कार्यक्रमाची सुरुवात जायंट्स प्रार्थना व दीपप्रज्वलनाने झाली.सदस्य गणपत रायकर व उमेश नाईक यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला.कार्यक्रमाचे निवेदन स्नेहा रायकर व केशव देशपांडे तर सतीशचंद्र पास्ते यांनी आभार मानले.
फोटो
पणजी–जायंट्स वेल्फेअर फौंडेशनच्या सोहळ्यात भाजपचे प्रदेश अध्यक्ष सदानंद शेटतानावडे, सदस्य दीपक डिसौझा, बसवराज पुजारी,नरुद्दीन सेवावाला व वर्षा नाईक व सन्मानमूर्ती