प्रबोधन प्राथमिक विद्यालयात मोठ्या उत्साहात शारदोत्सव साजरा करण्यात आला इयत्ता चौथीतील विद्यार्थी चि.खुश सुनील हळर्णकर यांनी मूर्तीचे पूजन केले सरस्वती पूजनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, रांगोळी, ठसे काम, फुलांपासून हार तयार करणे, सरस्वती माता प्रार्थना म्हणणे, देव देवतांची वेशभूषा स्पर्धा इत्यादी स्पर्धांचे आयोजन केले होते तसेच शिशुवाटिकेतील मुलांसाठी फुलांपासून रांगोळी, देव देवतांची वेशभूषा, कापसापासून वस्त्र तयार करणे , चित्र रंगवणे, ठसे काम, माता सरस्वती श्लोक पठण स्पर्धा इत्यादी स्पर्धांचे आयोजन केले होते तसेच पालकांसाठी पंचखाद्य, फाती/वेणी घालणे इत्यादी स्पर्धांचे आयोजन केले होते.
सरस्वती पूजनाच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी पोंबुर्फा ग्रामस्थांतर्फे भजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. वालेश्वर बाल घुमट आरती पथक खोर्जुवे येथील गटाद्वारे आरती सादर करण्यात आली ही आरती पोंबुर्फातील रहिवासी श्री.प्रसाद नरसे यांनी पुरस्कृत केली होती नंतर रवळनाथ फुगडी पथकाद्वारे वेगवेगळ्या फुगड्या सादर करण्यात आल्या. रात्री पोंबुर्फातील बालकलाकारांद्वारे आरती सादर करण्यात आली.
दुसऱ्या दिवशी बालभवन पोंबुर्फा केंद्राद्वारे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला गावातील महिला लोककलाकार सौ यशोदा चोडणकरांनी फुगडी म्हटली व पालकांनी व विद्यार्थ्यांनी सरस्वती मातेच्या समोर फुगडी सादर केली लोककलाकार सौ यशोदा चोडणकरांची ओटी भरून कार्यक्रमास त्यांचे स्वागत करण्यात आले. फळांची पावणी करण्यात आली. सरस्वती पूजनाला सजावट वाटारेश्वर डेकोरेटर श्री ईश्वर शेट यांनी केली होती. पालकांनी व शिक्षकांनी दिंडी सादर करीत मोठ्या उत्साहात माता सरस्वतीच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.