आस्कावाडा मांदे येथे स्मशानभूमीच्या रस्त्याचा प्रश्न पेटणार वाट अडवून विकासप्रकल्पाचे काम सुरू; ग्रामस्थांत संताप

.

आस्कावाडा मांदे येथे स्मशानभूमीच्या रस्त्याचा प्रश्न पेटणार
वाट अडवून विकासप्रकल्पाचे काम सुरू; ग्रामस्थांत संताप

आस्कावाडा मांद्रे येथील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता अडवून विकास प्रकल्पासाठी काम सुरू करण्यात आल्याने स्थानिक ग्रामस्थांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी ग्रामस्थांनी उत्तर गोवा जिल्हाधिकार्‍यांसह अनेक सरकारी कार्यालये आणि ग्रामपंचायतीकडे निवेदन सादर केले आहे.
पेडणे तालुक्यात स्मशानभूमीचा प्रश्न गहन बनला आहे. अनेक गावांमध्ये यावरून वाद होत आहेत. रस्ता, पायवाटा अडवण्याचे प्रकार होत आहेत. आस्कावाडा मांद्रे येथेही असाच प्रकार घडला आहे. स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचे अस्तित्व मिटवून तिथे विकास प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी कोणताही कायदेशीर परवाना घेतलेला नाही. जेसीबी मशीनद्वारे जमीन कापणी आणि सपाटीकरण सुरू झाल्याने, झाडे कापल्याने संतप्त नागरिकांनी परशुराम वासुदेव नाईक, वासुदेव परशुराम नाईक आणि मनोहर वासुदेव नाईक यांना स्मशानभूमीचा रस्ता सोडून काम करण्याची विनंती केली असता ती धुडकावून लावण्यात आली. याच रस्त्याने स्थानिक ग्रामस्थ ब्राह्मण देव, राष्ट्रोळी देव, पीर आही श्रद्धा स्थळांवर जातात. परंपरेप्रमाणे तिथी विधी केले जातात. रस्ता गायब केल्यायामुळे ग्रामस्थांनी तिथे कसे जावे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्यास काय करायचे, असा प्रश्न करून आमच्या न्याय्य आणि हक्काच्या मागणीसाठी कोणताही लढा देण्याची तयारी केल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामस्थांनी या तिघांविरोधात ग्रामपंचायतीत तकार केली. सचिवांनी काम सुरू असल्याठिकाणी भेट देऊन पाहणी केली आणि पुढील सूचनेपर्यंत काम न करण्याची विनंती केली असता तीही अव्हेरण्यात आली. ग्रामस्थांनी यासंदर्भात उपजिल्हाधिकारी, नगर नियोजन खाते, पंचायत संचालक, वन खाते, पोलिस महासंचालक, कृषी खाते, प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच उपजिल्हाधिकारी पेडणे, गटविकास अधिकारी, उपनगर नियोजक, वनाधिकारी, मांदे सरपंच, सचिव यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार करून सदर काम त्वरित बंद पाडावे आणि योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, स्थानिक पंचायत सदस्य तथा उपसरपंच सौ. तारा बाबुसो हडफडकर यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी सर्व संबंधित सरकारी अधिकार्‍यांकडे कारवाई करून नागरिकांच्या संभाव्य गैरसोयीकडे लक्ष वेधले आहे. संबंधितांनी त्वरित कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar