हरमल येथील हरमल पंचक्रोशी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या नूतन इमारतीचा वर्धापनदिन नुकताच उत्साहात पार पडला.

.

हरमल येथील हरमल पंचक्रोशी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या नूतन इमारतीचा वर्धापनदिन नुकताच उत्साहात पार पडला. यानिमित्त ‘मानसिक आरोग्य – तणाव व्यवस्थापन’ या विषयावर एका व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते

ह्या कार्यक्रमास तज्ञ डॉ पल्लवी धाकणे यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थी व शिक्षक वर्गाला ‘मानसिक ताणाचे व्यवस्थापन’ या विषयावर मार्गदर्शन केले.सद्यस्थितीत अशा प्रकारच्या मार्गदर्शनाची विद्यार्थ्यांना गरज आहे व आजच्या या कार्यक्रमाचा विद्यार्थ्यांना चांगला फायदा होईल, असे मत हरमल पंचक्रोशी शिक्षण मंडळाचे चेअरमन व माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.यावेळी व्यासपीठावर प्राचार्य गोविंदराज देसाई, विज्ञान शाखा संयोजक शामला नाईक रेडकर तसेच ज्येष्ठ शिक्षक शशीधर हळर्नकर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य गोविंदराज देसाई यांनी सर्वांचे स्वागत केले. रिषभ कोलवेकर यांनी मान्यवरांची ओळख करून दिली व त्यानंतर विद्यार्थ्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. हरमल पंचक्रोशी शिक्षण मंडळाचे चेअरमन व माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, प्रमुख वक्त्या मानसोपचारतज्ज्ञ डॉ. पल्लवी धाकणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा शामला नाईक रेडकर यांनी केले तर गीता कानोजी यांनी आभार प्रकटन केले.

फोटो
हरमल—हरमल पंचक्रोशी हायर सेकंडरी इमारतीच्या वर्धापनदिन प्रसंगी ‘मानसिक ताणाचे व्यवस्थापन’,मार्गदर्शन कार्यक्रमाचे उदघाटन करताना डॉ पल्लवी धाकणे सोबत चेअरमन लक्ष्मीकांत पार्सेकर,प्राचार्य गोविंदराज देसाई व विध्यार्थी प्रतिनिधी

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar