नाट्य क्षेत्रातील बहुमूल्य कार्यकरणाऱ्या पालयेतील श्री लिंगेश्वर पालये या संस्थेतर्फे नुकताच संस्थेच्या दशकपूर्ती सोहळ्यानिमित्त संस्थेचे सदस्य तथा नाट्य लेखक नरेंद्र मधुकर नाईक यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

.

नाट्य क्षेत्रातील बहुमूल्य कार्यकरणाऱ्या पालयेतील श्री लिंगेश्वर पालये या संस्थेतर्फे नुकताच संस्थेच्या दशकपूर्ती सोहळ्यानिमित्त संस्थेचे सदस्य तथा नाट्य लेखक नरेंद्र मधुकर नाईक यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
नरेंद्र नाईक यांची आज पर्यंत गजचर्मधारी, तुका झालासे कळस,सं. क्षात्रतेज,सं. कोंढाण्याचा सिंह, स्वामी सामर्थ्याचा,अवघी विठाई माझी आणि स्वामी समर्थ अशी एकूण सात नाट्य पुस्तके प्रकाशित झाली आहेत.तर नामा म्हणे,देवा तुझा मी सोनार,आवो साई,टिकल ते पॉलिटिकल अशी चार नाटके व रौद्र शंभो,समर्थ रामदास स्वामी,राजा शिव छत्रपती अशी तीन महानाट्य प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.
अनेक स्मरणिका, वृत्तपत्रे, नियकालिकांमधून कविता, कथा, ललितलेख, व्यक्ती चित्रण, प्रासंगिक लेख,असे विपुल लेखन त्यांनी केले आहे.तसेच एकांकिका, एकपात्री, वेशभूषा संवाद, कविता, नाट्य पदे, नांदी,स्वागत गीते, त्यांनी लिहिलेलीआहेत.उत्कृष्ट बातमीदार म्हणून दैनिक गोमंतक कडून २४ मार्च २००६ रोजी वर्धापनदिनी गौरव त्यांचा गौरवही झाला आहे.संगीत ‘तुका झालासे कळस’ या नाटकाला गोमंतक मराठी अकादमी पर्वरी यांचे नाट्य लेखनाचे द्वितीय पारितोषिक त्यांना प्राप्त झाले होते.
२०१४ साली सं. स्वामी सामर्थ्याचा या नाटकासाठी महाराष्ट्र राज्य कला व संस्कृती संचालनालायाच्या वतीने रत्नागिरी येथे आयोजित महाराष्ट्र राज्य संगीत नाट्य स्पर्धेत सादरीकरणाचे द्वितीय पारितोषिक व लेखनाचे प्रथम पारितोषिक त्यांना प्राप्त झाले होते.अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांचा २०१४ सालचा उत्कृष्ट संगीत नाट्य लेखनासाठी ‘ स्वरराज छोटा गंधर्व गुणगौरव पुरस्कारचेही ते मानकरी ठरले.
छत्रपती शाहू प्रतिष्ठान इब्रांपुर, नवचेतना युवक संघ पेडणे, फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठान पेडणे, आणि कला आणि संस्कृती संचालनालय गोवा सरकार आयोजित तिसरे साहित्य संमेलन २०२१ (फुले शाहु आंबेडकर विचार प्रसार साहित्य संमेलन) ११ डिसेंबर २०२१ रोजी तालुका शिक्षण अधिकारी म्हणून पेडणे तालुक्यात केलेल्या कार्याबद्दल त्यांना गौरविण्यात आले.६ सप्टेंबर 2022 रोजी पेडणे तालुका विकास समिती आणि सम्राट क्लब यांनी शिक्षक दिनाच्या औचित्यावर पुरस्कार देवून गौरविले.
पेडणे तालुका शिक्षणाधिकारी म्हणून तब्बल बारा वर्षे यशस्वीरीत्या कार्य बजावल्या नंतर अलीकडेच त्यांना राजपत्रित अधिकारी म्हणून सेवेत बढती मिळून सद्या ते शासकीय माध्यमिक विद्यालय हनखणे पेडणे येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
संस्थेच्या दशकपूर्ती सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांच्या स्वामी समर्थ या नाट्य पुस्तकाचे विमोचन केल्यानंतर प्रमुख पाहुणे आमदार जीत आरोलकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप, सरपंच सौ. रंजना परब,संस्थेचे कार्यक्रम प्रमुख तथा पंच सदस्य सागर तीळवे ,संस्थेचे अध्यक्ष देवीदास उर्फ लाडू तीळवे, अर्जुन तीळवे, अशोक गवंडी,पंच सदस्य सौ. राधा परब, कु. स्नेहा गवंडी, संदीप न्हानजी, शीवा तीळवे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक अध्यक्ष लाडू तीळवे यांनी केले. परिचय प्रसाद परब यांनी करून दिला. कार्यक्रमांचे सूत्र संचालन सौ. प्रगती महेंद्र परब हीने केले तर सागर तीळवे यांनी आभार मानले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar