श्री लिंगेश्वर पालये या संस्थेतर्फे 2 ऑक्टोबर रोजी संस्थेच्या दशकपूर्ती सोहळ्यानिमित्त संस्थेचे सदस्य तथा एक नाट्यकलाकार, अर्जुन उर्फ सज्जन तीलवे यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
आज पर्यंत संस्थेच्या तसेच इतर मिळून ५४ नाटकातून महत्त्वाच्या भूमिका त्यांनी साकारलेल्या आहेत. काही खास उल्लेखनीय अशा त्यांच्या भूमिका नमूद करायच्या झाल्या तर मृत्युंजय नाटकातील महारथी कर्ण, रायगडाला जेव्हा जाग येते नाटकातील युवराज संभाजीराजे महाराजांची भूमिका, गजचर्म धारी नाटकातील शुक्राचार्य, छात्रतेज मधील जमदग्नी,ब्रम्हतेज मधील द्रोणाचार्य, अशा काही त्यांच्या मुख्य भूमिका त्यांनी साकारल्या आहेत. विद्यार्थीदशेत असताना चिमुकले वीर नाटकातील कुश या भूमिके पासून त्यांनी नाटकात भूमिका करायला सुरुवात केली. संस्थेच्या तसेच इतर नाटकांसाठी त्यांनी दिग्दर्शक म्हणूनही काम केले आहे.
शिवाय सरकारी नोकरीत येण्यापूर्वी त्यांनी समाजकारणातून राजकारणात कार्य करताना पालये पंचायतीचे सरपंचपद देखील भूषविले आहे.
सद्या ते गोवा गृहनिर्माण महामंडळाच्या नोकरीत कार्यरत आहेत.
संस्थेच्या दशकपूर्ती सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप, सरपंच सौ. रंजना परब, नाट्य लेखक नरेंद्र नाईक, संस्थेचे कार्यक्रम प्रमुख तथा पंच सदस्य सागर तीलवे ,संस्थेचे अध्यक्ष देवीदास उर्फ लाडू तीलवे, पंच सदस्य सौ. राधा परब, कु. स्नेहा गवंडी, संदीप न्हानजी, शीवा तीलवे, अशोक गवंडी आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्र संचालन सौ. प्रगती महेंद्र परब हीने केले तर सागर तीलवे यांनी आभार मानले.
श्री लिंगेश्वर पालये या संस्थेतर्फे 2 ऑक्टोबर रोजी संस्थेच्या दशकपूर्ती सोहळ्यानिमित्त संस्थेचे सदस्य तथा एक नाट्यकलाकार, अर्जुन उर्फ सज्जन तीलवे यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

.
[ays_slider id=1]