सुझलॉन एनर्जीने राईट्स इश्यू खुला केला
क्षमतेनुसार विंड कंपोनंट मॅन्युफॅक्चरिंग उद्योगक्षेत्रातील भारतातील एक आघाडीची उत्पादक आणि भारतातील एक आघाडीची रिन्यूएबल ओअँडएम सेवा पुरवठादार सुझलॉन एनर्जी लिमिटेडने १२०० कोटी रुपयांचे भांडवल उभारण्यासाठी आपला राईट्स इश्यू ११ ऑक्टोबर २०२२ रोजी खुला केला आहे. या राईट्स इश्यूचा एंटायटलमेंट रेशो ५:२१ आहे (४ ऑक्टोबर २०२२ च्या रेकॉर्ड तारखेनुसार कंपनीच्या पात्र समभागधारकांकडील प्रत्येक २१ इक्विटी शेयर्ससाठी ५ शेयर्स)
सहा खंडांमध्ये १७ देशांमध्ये व्यवसाय करत असलेल्या सुझलॉन एनर्जीने ३० जून २०२२ रोजीच्या आकडेवारीनुसार, भारतात जवळपास १३.४५ गिगावॅट संस्थापित क्षमतेसह पवन ऊर्जा ओईएम म्हणून सर्वात मोठा संस्थापित पवन ऊर्जा बेस उभारला आहे. भारताच्या संस्थापित पवन ऊर्जा बेसमध्ये ३३% योगदान सुझलॉन एनर्जीचे आहे. क्षमतेनुसार विचार करता, ही भारतातील सर्वात मोठी पवन ओअँडएम सेवा पुरवठादार आहे. भारताच्या बाहेर या कंपनीची संस्थापित क्षमता जवळपास ५.९६ गिगावॅट आहे आणि एकूण ग्लोबल संस्थापित क्षमता १९.४४ गिगावॅट आहे.
विंड टर्बाईन जनरेटर्स आणि त्यांचे भाग तयार करण्यासाठी आवश्यक असलेले फोर्जिंग आणि फौंड्री भाग तयार करण्यासाठी सुझलॉनने भारतभरात महत्त्वाच्या ठिकाणी १६ उत्पादन सुविधा उभारल्या आहेत. या कंपनीकडे ७०० मेगावॅटच्या ऑर्डर्स आधीपासून आहेत. तब्बल २७ पेक्षा जास्त वर्षांचा, सिद्ध झालेला ट्रॅक रेकॉर्ड आणि एकीकृत, कमी खर्चाची पुरवठा शृंखला यामुळे सुझलॉनने विविध ग्राहकांसमवेत संबंध प्रस्थापित केले आहेत, यामध्ये मोठे स्वतंत्र ऊर्जा उत्पादक, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या आणि मार्की संस्थांचा समावेश आहे.
हाय पीएलएफ प्रकल्पांसाठी पवन ऊर्जा महत्त्वाची असल्यामुळे कमर्शियल आणि इंडस्ट्रियल विभाग खूप तेजीत आहे, आणि कंपनीला अपेक्षा आहे त्यामुळे त्यांच्या वृद्धीला चालना मिळेल. त्याबरोबरीनेच हायब्रीड (सौर + पवन) ऊर्जा हा देखील एक महत्त्वाचा घटक आहे, बहुतांश ग्राहक आणि कंपन्या अधिक जास्त पीएलएफ आणि शेड्युल्ड ऊर्जा उपलब्धता यांना प्राधान्य देतात. सध्याच्या क्षमतांना देखील पुनःनिर्मितीची आवश्यकता भासेल त्यामुळे विंड रिपॉवरिंगमुळे २०३० सालापर्यंत जवळपास २० गिगावॅट क्षमतेला चालना मिळेल. पवन ऊर्जा क्षेत्रासाठी सरकारी धोरणे देखील अनुकूल आहेत. भारतात पवन ऊर्जा प्रकल्पांसाठी इलेक्ट्रॉनिक रिव्हर्स ऑक्शन थांबवण्याच्या निर्णयाला तत्त्वतः मान्यता हा त्याचाच एक भाग आहे.
आगामी राईट्स इश्यूमध्ये सहभागी होणार असल्याची खात्री प्रमोटर्स आणि प्रमोटर ग्रुपने पुन्हा एकवार दिली आहे. त्यांनी असेही घोषित केले आहे की ते त्यांच्या राईट्स पात्रतेइतके संपूर्ण सब्स्क्रिप्शन करतील. कंपनीतील एक महत्त्वाचे गुंतवणूकदार श्री. दिलीप संघवी यांनी देखील सांगितले आहे की, शेयर बाजाराकडे सादर करण्यात आलेल्या डिस्क्लोजर्सप्रमाणे अतिरिक्त शेयर्ससाठी सबस्क्राईब करून या राईट्समध्ये पूर्णपणे सहभागी होण्याचा त्यांचा उद्देश आहे. या राईट्स इश्यूमध्ये सब्स्क्रिप्शनला किमान मर्यादा नाही. सब्स्क्रिप्शन लेव्हल कितीही असली तरी या राईट्स इश्युमार्फत उभारण्यात आलेली रक्कम कंपनी वापरू शकेल.
या राईट्स इश्यूमधून उभारण्यात येणाऱ्या भांडवलाचा वापर कंपनीची शिल्लक कर्जे कमी करण्यासाठी केला जाईल, ज्यामुळे कंपनीची बॅलन्स शीट मजबूत होईल, इंटरेस्ट कॉस्ट आऊटगो कमी होईल आणि लाभदायकता सुधारेल. यामुळे कंपनीसाठी खेळते भांडवल उपलब्ध होईल आणि प्रकल्पांच्या अंमलबजावणीमध्ये वाढ होईल. लेटर ऑफ ऑफरनुसार सध्या कंपनीची एकूण कर्जे ३२७२ कोटी रुपयांची असून या राईट्स इश्यूमधून उभ्या राहणाऱ्या भांडवलातून त्यापैकी काही रकमेची परतफेड केली जाईल.
जबाबदारी व्यवस्थापन कार्यक्रम आणि महत्त्वाच्या नसलेल्या संपत्तीच्या विक्रीमधून आपले आर्थिक स्थान बळकट करण्याचे काम सुरु ठेवावे हा सुझलॉनचा उद्देश आहे. संचालनामध्ये अधिक जास्त कार्यक्षमता आणावी आणि निश्चित खर्च कमी व्हावेत यासाठी ही कंपनी: (१) भारतीय बाजारपेठांमध्ये डब्ल्यूटीजीच्या विक्रीवर लक्ष केंद्रित करणे (२) विविध व्यवसाय विभागांची पुनर्रचना (३) भारतीय बाजारपेठेसाठी तयार करण्यात आलेली नवी डब्ल्यूटीजी मॉडेल्स विकसित करणे (४) भारतामध्ये ओअँडएम सेवा व्यवसायाचा विस्तार करणे (५) खेळत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी फंडिंगचा जास्तीत जास्त वापर करून घेणे.