हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्तीच्या निमित्ताने शिरसई येथे हिंदूसंघटन मेळावा संपन्न*

.

 

*हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्तीच्या निमित्ताने शिरसई येथे हिंदूसंघटन मेळावा संपन्न*

शिरसई, १४ ऑक्टोबर – हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्तीच्या निमित्ताने शिरसई येथील श्री गोपाळकृष्ण देवस्थान येथे हिंदूसंघटन मेळावा झाला. या मेळाव्यात हिंदु जनजागृती समितीचे उत्तर गोवा समन्वयक श्री. गोविंद चोडणकर यांनी हिंदूंवर होणारे आघात आणि त्यांवरील उपाययोजना यांविषयी उदबोधक असे मार्गदर्शन केले.
श्री. गोविंद चोडणकर पुढे म्हणाले, ‘‘गोव्यात बांगलादेशी घुसखोर अनेक वर्षे अवैधपणे वास्तव्य करतांना आढळले आहेत. यामुळे देशाची सुरक्षा धोक्यात येऊ शकते. शासनाने त्वरित राज्यात अवैधपणे वास्तव्य करणार्‍या बांगलादेशी घुसखोरांना शोधून काढून त्यांना मायदेशी पाठवायला हवे. देशातील ‘हलाल जिहाद’ ‘लव्ह जिहाद’ आदी समस्यांवर मात करण्यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे. गावांतील मंदिरांचा उपयोग हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासाठी करावा.’’ श्री गोपाळकृष्ण देवस्थान येथे दर गुरुवारी सायंकाळी साप्ताहिक बैठक चालू करण्याचा निर्णय मेळाव्यात घेण्यात आला. मेळाव्या प्रारंभी हिंदु जनजागृती समितीचे श्री. युवराज गावकर यांनी मेळाव्याचा उद्देश सांगितला. मेळाव्याला श्री गोपाळकृष्ण मंदिराचे अध्यक्ष सर्वश्री अशोक नाईक आणि सचिव सत्यवान म्हामल, शिरसई येथील श्री महालक्ष्मी देवस्थानचे अध्यक्ष उमाकांत कुढणेकर , ‘पतंजली योग समिती’चे विश्वजी तळकटकर, जिल्हा परिषद सदस्य सौ. दीक्षा कानोलकर, शिरसई पंचायतीच्या सदस्या सौ. सिमरन उसकईकर, ‘भारत माता की जय’ संघटनेचे श्री. कपिल वझे, आदींची प्रमुख उपस्थिती होती. मेळाव्याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना भारत माता की जय संघटनेच्या सौ. लेखिता च्यारी म्हणाल्या ‘‘गावातील युवायुवतींना स्वसंरक्षण, धर्मशिक्षण शिकवण्याची अत्यंत गरज आहे.”

आपला विश्वासू,
*डॉ. मनोज सोलंकी*
हिंदु जनजागृती समिती, (संपर्क : 9326103278 )

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar