थिवी नवा
श्री दत्त पद्मनाभ पीठ संप्रदाय संचलित संत समाज गणेशपुरी खोरली काणका नुतन अध्यक्षपदी राजेंद्र धारगळकर तर सचिव पदी विठ्ठल पालयेकर यांची तीन वर्षासाठी निवड करण्यात आली. 

सुजन नाईक यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत २०२२-२०२५ या कालावधीसाठी नुतन कार्यकारिणी समितीची निवड करण्यात आली. श्री दत्त तपोभूमी चे श्री दत्त पद्मनाभ पीठ संचालक राजेश दळवी, म्हापसा क्षेत्रीय प्रमुख सुजन नाईक, गुरू बंधू, भगिनी यांच्या उपस्थितीत नुतन समीती घोषित करण्यात आली.
अध्यक्ष _ राजेंद्र धारगळकर, उपाध्यक्ष तुषार नाईक, सचिव विठ्ठल पालयेकर, सहसचिव _ महादेव साताडैकर, खजिनदार _ संजय मडगावकर, उप खजिनदार_ प्रविता नाईक, सदस्य_ रुद्रेश गडेकर, पुंडलिक नाईक, स्नेहा जानकर
माजी समीती अध्यक्ष विठ्ठल पालयेकर यांनी आभार मानले. म्हापसा चे क्षेत्रीय प्रमुख सुजन नाईक व राजेश दळवी, संचालक यांनी संत समाजाला मार्गदर्शन केले.